ETV Bharat / city

क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले.. सहा तासात दुसरा खून, महिलेची गळा चिरून हत्या - नागपुरात सहा तासात दुसरी हत्या

अवघ्या काही तासात दोन खुनाच्या घटनांनी नागपूर शहर हादरले आहे. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले
क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले
author img

By

Published : May 14, 2021, 5:20 PM IST

Updated : May 15, 2021, 1:05 PM IST

नागपूर - अवघ्या काही तासात दोन खुनाच्या घटनांनी नागपूर शहर हादरले आहे. नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर (वय ६१) असे मृत महिलेचे नाव आहे.

क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले
क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले

नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एसआरपीएफ कॅम्प पाठीमागील सप्तक नगरात ६२ वर्षीय वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर असे मृत महिलेचे नाव आहे. त्या सेवानिवृत्त असून एकट्याच राहत होत्या. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून खून होण्यामागील कारणांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले
क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले

विजयाबाई तिवलकर राज्य राखीव पोलीस दलातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा एक मुलगा हा देखील एसआरपीएफमध्ये कार्यरत असून त्याची पोस्टिंग हिंगणा येथे आहे. मात्र मृत विजया या मुलासोबत राहत नसून वेगळ्या राहायच्या. गुरुवारी संध्याकाळी विजया या शेजारच्यांसोबत बोलल्या होत्या, मात्र आज सकाळपासून त्या घराबाहेर आल्या नाहीत. दुपारच्या वेळात त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी आली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. घरकाम करणाऱ्या महिलेने या संदर्भात शेजारच्या लोकांना सूचना दिली, त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली. त्यानंतर एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. मृत विजया यांचा गळा चिरण्यात आला असून डोक्यावर देखील जखमा आढळून आल्या आहेत. मृत महिलेच्या घरातील महागड्या वस्तु व अंगावरील दागिने जसेच्या तसे आहेत. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला नसावा, असा कयास पोलिसांकडून लावला जात आहे.

सहा तासात दोन खुनाच्या घटना -

विजयाबाई पांडुरंग तिवलकर यांच्या खुनाची घटना समोर येण्यापूर्वी काही तासांच्या आधी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आरोपींनी संगनमत करून एका कुख्यात गुंडाचा खून केला आहे. शानु उर्फ शहनवाज असे मृताचे नाव आहे. अवघ्या काही तासात दोन खुनाच्या घटना घडल्याने क्राईम कॅपिटल असलेले नागपूर शहर पुन्हा हादरले आहे.

Last Updated : May 15, 2021, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.