ETV Bharat / city

नागपूरकरांनो लसीकरणासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी करा 'हे' काम - Nagpur District Latest

राज्यामध्ये कोविड लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे. पूर्वी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमध्ये सुरूवातीला सहा ते आठ आठवड्यांचा अंतर ठेवण्यात येत होते. आता या लसीच्या दोन डोसमधील कालावधी आणखी वाढविण्यात आला आहे.

कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस ३ महिन्यानंतर

author img

By

Published : May 17, 2021, 9:59 AM IST

नागपूर - लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या नवीन सूचना आल्या आहेत. यानुसार आता कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेसमधील अंतर बारा ते सोळा आठवडे असणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला असेल, तर दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यानंतर दिला जाणार असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी पहिला डोस घेऊन किती कालावधी झाला हे तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

पूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाही

पहिला डोस घेऊन झाला असेल आणि दुसरा डोज घ्यायचा असेल तर किमान 12 आठवडे, म्हणजेच तीन महिने झाले असेल तरच लसीकरणाची तारीख व लसीची उपलब्धता तपासून दुसऱ्या डोससाठी घराबाहेर पडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. कोविशील्डसाठी हा नियम असला तरी, कोव्हॅक्सिन लसीच्या यापूर्वीच्या सूचनांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाहीत.

लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठीचा प्रयत्न

लसीकरणासंदर्भात सध्या 45 वर्षावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी लसीकरण करण्याच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र केंद्र सरकारने लसीकरणाच्या नियमात सध्या बदल केला आहे. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी कोव्हिशील्डचे लसीकरण झाले आहे. या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर वाढविण्यात आले आहे. अनेक जण तीन महिन्यांचे अंतर लक्षात न घेता लसीकरण केंद्रावर पोहोचत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून नागरिकांनी या काळामध्ये घराबाहेर पडताना आपल्या लसीकरणाच्या नेमक्या तारखा, लसीची उपलब्धता लक्षात घेऊन बाहेर पडावे, असेही स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - तौक्ती चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या समुद्र हद्दीत दाखल; रात्रीपासून मुसळधार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.