ETV Bharat / city

School van accident : शाळेत जाणारी स्कुल व्हॅन नाल्यात कोसळली; सुदैवाने १८ विद्यार्थी थोडक्यात वाचले - मुसळधार पाऊस

School van accident : नाल्यात व्हॅन कोसळल्यानंतर तातडीने मुलांना बाहेर काढण्यात आले. पण, दोन मुलांच्या नाका तोंडात पाणी गेले होते. स्कुल व्हॅनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

School van accident
School van accident
author img

By

Published : Aug 8, 2022, 11:27 AM IST

नागपूर - नागपूरच्या बेसा- बेलतरोडा भागात एक स्कुल व्हॅन नाल्यात कोसळली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व विद्यार्थी एका खासगी शाळेचे आहेत. आज सकाळी सुमारे १८ विद्यार्थ्यांना घेऊन स्कुल व्हॅन शाळेच्या दिशेने जात होती.

खासगी रुग्णालयात उपचार सुरू - त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे स्कुल व्हॅन थेट नाल्यात जाऊन पडली आहे. सुदैवाने नाला जास्त खोल नसल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरित सर्व विद्यार्थी सुखरूप असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पोलीस घटनास्थळी दाखल - या घटेनची माहिती समजताचं परिसरातील लोकांनी बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यामुळे स्कुल व्हॅनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा - Girl Sexually Abused : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना;अल्पवयीन मुलीवर बापानेच केला अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.