ETV Bharat / city

Sanjay Raut's reply to Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना सुबुद्धीचे अजीर्ण - संजय राऊतांचे फडणवीसांना प्रत्युत्तर - Sanjay Raut's reply to Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांना सुबुद्धीचं अजीर्ण झालं आहे, थोडी सुबुद्धी त्यांच्या लोकांना मिळाली, तर महाराष्ट्र शांत राहील, या गोष्टी आम्ही त्यांना सांगू असं संजय राऊत ( Sanjay Raut's reply to Fadnavis ) म्हणाले आहेत.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Apr 21, 2022, 10:54 PM IST

नागपूर: नागपूरच्या मातीत आणि वातावरणात वेगळेपण आहे, संजय राऊत यांनी नागपूरचे वारंवार दौरे केल्यास त्यांना सुबुद्धी लाभेल, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी आज नागपुरमध्ये केले होते. त्याला शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. फडणवीस यांना सुबुद्धीचं अजीर्ण झालं आहे, थोडी सुबुद्धी त्यांच्या लोकांना मिळाली, तर महाराष्ट्र शांत राहील, या गोष्टी आम्ही त्यांना सांगू असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते आजपासून तीन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आले आहेत. या तीन दिवसात ते पक्ष बांधणीसाठी आणि बळकटीसाठी अनेक बैठका घेणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत संजय राऊत यांचा हा तिसरा नागपूर दौरा ( Sanjay Raut Nagpur tour ) आहे.

संजय राऊत यांचे फडणवीसांना उत्तर

संजय राऊत यांचे नागपूर दौरे वाढले आहेत. यावर त्यांना विचारले असता ते म्हणाले की, नागपूरला महत्त्व आहेच. नागपूर आमची उपराजधानी आहे. नागपुरकरांचे प्रेम आमच्यावर वाढत आहे. बरेच नागपुरकर हल्ली मुंबईत असतात. म्हणून आम्हाला आमचा मुक्काम नागपुरला वाढवावा लागला असल्याचं उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

दिल्लीत दंगल कुणी घडवली - दिल्लीत झालेली दंगल कोणी घडवून आणली, हे संपूर्ण देशाला माहित आहे. भाजप देशातील वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे, मात्र हे देशाच्या एकतेसाठी योग्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

विरोधकांनी समोरून लढावे - आमच्या घरावर ही ईडीच्या धाडी पडल्या आहेत. आम्ही सरकार विरोधात बोलल्यानंतर ईडीने कारवाई केली, अशाप्रकारे राज्य चालत नाही. विरोधकांनी लढायचं असेल तर समोरून लढायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी विरोधकांना दिले आहे.

हा तर शतकातील सर्वात मोठा विनोद - अमरावती घडलेल्या दंगलीनंतर अमरावती जिल्हात हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं असल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्याला प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र देखील आहेत. शिवाय शिवसेनाप्रमुख सुद्धा आहेत. ज्या शिवसेनेने हिंदुत्वासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या शिवसेनेच्या राज्यांमध्ये हिंदूंना टार्गेट केले जात आहे, असं कोणी म्हणत असेल, तर तो शतकातील सर्वात मोठा विनोद असेल, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा - Video : भिकारी दामप्त्यांनी केला 'त्या' युवकाचा खून, मृतदेह आढळला होता भंगार कारच्या डिक्कीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.