नागपूर - सध्या तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक आहे. त्यावर संजय राऊत यांनी नागपुरात प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना नेते संजय राऊत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही आमची घोड चुक होती, आता तसी चुक होणार नाही. महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही असेही संजय राऊत म्हटले आहेत. शिवसंपर्क अभियानासाठी ते विदर्भ दौऱ्यावर ( Sanjay Raut on Vidarbha tour ) आहेत. त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद ( Sanjay Raut in Nagpur ) घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका ( Sanjay Raut Attack on Central Govt ) केली.
'शिवसेनेला कुणीही वाकवू शकत नाही'
केंद्रीय तपास यंत्रणाचा खुळखुळा झालेला आहे, ते घाबरवत आहेत. त्याचा मी पण पिडीत आहे. माझ्या सारख्या मध्यमवर्गीय माणसावर आरोप करण्यात आले आहेत. त्याला एक वर्ष झाले मात्र त्यांना अजूनही चौकशीत काहीही सापडले नाही. यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय यंत्रणांकडून फार कमी कारवाया होत होत्या, मात्र आता प्रचंड प्रमाणात कारवाई केल्या जात आहेत. त्यामागे काय हेतू आहे. त्या कारवायांमधून काय सापडले असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमची बदनामी केली जात आहे, मात्र शिवसेनेला कुणीही वाकवू शकत नाही. एवढेच काय तर कुणीही महाविकास आघाडीचा बालबाका करू शकणार नाही, असे राऊत म्हणाले.
'संघाला जनाब म्हणणार का?'
'नागपूरमध्ये मी बसलेलो आहे, या ठिकाणी संघाचे मुख्यालय आहे. हिंदुत्वाची एक विचारधारा इथून देशभरात गेली. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहन भागवत आहे, त्यांची गेल्या काही काळातील मुस्लीम संदर्भातली वक्तव्य ऐकली तर तुम्ही संघाला जनाब संघटन म्हणणार का?, मोहन भागवत यांनी अनेक वेळेला म्हटले आहे, की मुस्लिमांचा डीएनए हिंदूच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम विचार मंचाची स्थापना केली, मग ते जनाब संघटनेचे सरसंघचालक झाले का?' असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
'शिवसेना वाढवण्याचा आम्हाला अधिकार' -
शिवसेनेने संदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. विदर्भाने बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर खूप प्रेम केले, कधीकाळी आमचे आमदार चांगल्या संख्येने येथून निवडून येत होते. गेल्या काही वर्षात विदर्भातून विधानसभेत आमच्या प्रतिनिधित्व कमी झाले आहेत, त्याला काही कारणं आहेत ते दुरुस्त करण्यासाठी शिवसेनेने हे अभियान सुरू केले आहे. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे तिथून आम्ही ही मोहीम सुरू केली आहे त्याबद्दल आमची राजकारण करण्याची इच्छा नाही मात्र आमचा पक्ष वाढवण्याचा आम्हाला अधिकार आहे.
विदर्भाचा गैरसमज दूर करण्यासाठी दौरा -
मुंबई अधिवेशन सुरू असल्याने नेते मुंबईत आहेत. महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचे सरकार असले तरी शिवसेना प्रमुख पक्ष आहे. शिवसेना 50 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये आहे, काम करते आहे, केवळ संघटनेच्या जोरावर शिवसेनेचा व्याप वाढवण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी दौरा योजला आहे. विदर्भाने बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप प्रेम केलं, मात्र गेल्या काही वर्षात विदर्भातून शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळत नसल्याने विदर्भ आणि नागपूर दौरा सुरू केला आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याची इच्छा आहे, राजकारण करण्यात रस नाही, भावना गवळी यांच्या मागे केंद्र सरकारने चौकशीचा ससेमिरा लावला आहे, त्यामुळे त्या न्यायालयात गेल्या असल्याने गवळी आज उपस्थित नाहीत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - काशीनाथाचे चांगभले म्हणत बगाड यात्रेला सुरुवात