ETV Bharat / city

पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्तांच्या साथीने एकत्रितपणे कोरोनाशी लढणार- महापौर संदीप जोशी - sandeep joshi news

महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत येत्या काळात जनता कर्फ्यू लावायचा का? कोणत्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करायची? कोरोना रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येईल? याची चर्चा बैठकीत झाल्याचे महापौर संदीप जोशींनी सांगितले.

sandip joshi
संदीप जोशी
author img

By

Published : Sep 7, 2020, 7:37 PM IST

नागपूर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. आज याच अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि महापौर संदीप जोशी यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत कोरोना प्रसार रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा झाली, अशी माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. कोरोना संकटाचा सामना महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या साथीने एकत्रितपणे करण्यात येणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.

संदीप जोशी, महापौर

संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे यांच्याविरोधात महापालिकेने कारवाई सुरु केलेली आहे. पोलीस विभागदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करणार आहे. येत्या काळात जनता कर्फ्यू लावायचा का, कोणत्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करायची. कोरोना रोखण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना करता येईल, याची चर्चा बैठकीत झाल्याचे संदीप जोशींनी सांगितले.

हेही वाचा-सुशांतसिंह प्रकरण : अमलीपदार्थ विक्रेता अनुज केशवानी ताब्यात

दररोज दीड ते दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत असताना सुद्धा नागरिकांमध्ये भीती उरली नसल्याने सर्रासपणे नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. म्हणून आता महापालिका आणि पोलीस विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. घराबाहेर पडल्यानंतर सुद्धा मास्क न वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन कुठेही होताना दिसत नसल्याने आता महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त नव्याने रुजू झाले असल्याने त्यांना शहरातील परिस्थितीची माहिती देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.