नागपूर - उपराजधानी नागपूरात घडलेले दुहेरी हत्याकांड आणि त्यानंतर आरोपीने केलेली आत्महत्या या धक्कादायक प्रकारातून नागपूरकर सावरण्याआधीच पुन्हा खुनाची घटना घडली आहे. मानलेल्या बहिणीसोबत का बोलतो या कारणावरून गुंडाने ३० वर्षीय विवाहित तरुणाचा खून केला. शहराच्या उत्तर भारत असलेल्या यशोधरा नगर पोलीस स्टेशनअंतर्गत माजरी रेल्वे अंडर ब्रिजजवळ हा गुन्हा घडला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
किशोर नंदनवार (३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शेख सिराज उर्फ शेरखान असे आरोपीचे नाव आहे. मांजरी पुलाजवळ दोन व्यक्तींमध्ये वाद झाल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. या सूचनेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भार्गव हे आपल्या घटनास्थळी गेले असताना आरोपी शेख सिराज उर्फ शेरखान पळून जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, जखमी किशोर नंदनवार यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. आरोपी शेरखानवर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आहेत.
हेही वाचा-लालबाग सिलेंडर स्फोट प्रकरणी दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
यापूर्वीसुद्धा झाला होता वाद-
आरोपी शेख सिराज उर्फ शेरखान आणि किशोर नंदनवार यांच्यात यापूर्वी वादावादी झाली होती. नंदनवार यांनी आरोपीच्या बहिणीसोबत संवाद साधला होता. याची आरोपीला माहिती मिळताच त्याने किशोर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केले होते. त्यानंतर विवाहित तरुणाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांनी सांगितले.
हेही वाचा-पंढरपूर : चाळीस लाखांची सुपारी घेऊन जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या चौघांना अटक
नागपूरमध्ये आठ दिवसांमध्ये खुनाची तिसरी घटना-
विशेष म्हणजे ३६ तासांपूर्वीच नागपुरात कथित एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड घडले होते.आता मानलेल्या बहिणीसोबत बोलतो या रागातून गुंडाने एकाची हत्या केली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये खुनाची तिसरी घटना घडल्याने नागपूर शहर हादरून घडले आहे.