नागपूर - शबरीमला प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी यासंबंधीचे एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्यांची गंभीर स्थिती सरकारच्या कानावर घालून मदतीसाठी प्रयत्न करणार - शरद पवार
परंपरा आणि चालीरीतींशी संबंधित बाबी विश्वास आणि श्रद्धेचे विषय आहेत. शबरीमला तीर्थक्षेत्रासाठी विशिष्ट वयोगटातील स्त्रियांवरील निर्बंधास भेदभावाचे काहीच कारण नाही आणि ते देवतांच्या वैशिष्ट्यावर आधारित आहे, असे या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आमचे ठाम मत आहे की, या संदर्भात ज्या काही बाबी आहेत त्यानुसार न्यायालयीन पुनरावलोकन करणे आपल्या राज्यघटनेद्वारे निश्चित केलेल्या उपासना, स्वातंत्र्याच्या भावनेचे उल्लंघन करणारे नको. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या पुनरावलोकन याचिका स्वीकारण्याचे आणि प्रकरण मोठ्या घटनात्मक खंडपीठाकडे पाठवण्याचे स्वागत करतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या माध्यमातून स्पष्ट केले आहे.