ETV Bharat / city

Dasara Vijayadashami in Nagpur : आरएसएसच्या विजयादशमीसह धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम, नागपुरात ५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

नागपुरात दोन मोठे कार्यक्रम असल्यामुळे शहर ( On Occasion of Vijayadashami ) पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण येणार ( Big Security Stress on Nagpur City Police ) आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा "अलर्ट मोड"वर कामाला लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला ( 66th Dhammachakra Enforcement Day ) असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

Dasara Vijayadashami in Nagpur
नागपुरात ५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त
author img

By

Published : Oct 4, 2022, 11:26 AM IST

नागपूर : विजयादशमीच्या निमित्ताने नागपुरात दोन मोठे कार्यक्रम असल्यामुळे ( On Occasion of Vijayadashami ) शहर पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण येणार ( Big Security Stress on Nagpur City Police ) आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणा "अलर्ट मोड"वर कामाला लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात तगडा ( Vijayadashami Celebration of RSS ) पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती ( 66th Dhammachakra Enforcement Day ) शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली ( Police Commissioner Amitesh Kumar Informed ) आहे.

शहरात तगडा पोलिस बंदोबस्त : धम्मचक्र प्रवर्तन सोहळा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव त्याचबरोबर रावण दहन आणि दुर्गा मंडळाचे विसर्जन आणि ड्रॅगन पॅलेस येथील सोहळा या सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने जमणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दोन्ही उत्सव एकाच दिवशी असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहरात तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.

शहरात एकूण ५ हजार पोलीस तैनात : शहरातील प्रत्येक भागात पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत. यामध्ये ५ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी, एसआरपीफच्या चार तुकड्या, १ हजार होमगार्ड जवान तैनात करण्यात आलेले आहे. कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

दीक्षाभूमीला अडीच हजार पोलिसांचे सुरक्षा कवच : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा तब्बल दोन वर्षांनंतर सार्वजनिकरित्या साजरा होणार आहे. दोन्ही ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा फायदा घेऊन कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याकरिता तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त दीक्षाभूमी आणि परिसरात असणार आहे. यादरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता अनेक मार्गात बदल देखील करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.