नागपूर- अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी गठित केल्या जाणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्षपद सरसंघचालकांनी स्वीकारू नये, असे मत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंपतराय यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काही साधुंनी अयोध्या राम मंदिर निर्मितीसाठी बनवल्या जाणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष सरसंघचालकांनी व्हावे, अशी मागणी केली होती. त्यावर प्रश्न विचारले असता उत्तर देताना चंपतराय यांनी एक स्वयंसेवक म्हणून सरसंघचालकांनी अध्यक्ष होऊ नये, असे मत व्यक्त केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावयाची 5 एकर जमीन अयोध्या शहराच्या सीमेवर किंवा सीमेच्या बाहेर देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.