ETV Bharat / city

Omicron Nagpur Review : नागपूर विभागीय आयुक्तांकडून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा आढावा - Oxygen Generation Projects Nagpur

‘एम्स’मध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी ( Inspection of Oxygen Generation Projects ) केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ( Oxygen Supply to All India Institute of Medical Sciences Nagpur ) व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Review of Oxygen Generation Projects
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा आढावा
author img

By

Published : Dec 3, 2021, 10:26 AM IST

Updated : Dec 3, 2021, 12:31 PM IST

नागपूर - कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनची ( Corona New Variant Omicron ) धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. भारतात देखील ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने ( Nagpur District Administration ) खबरदारीचा म्हणून उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा ( Divisional Commissioner Prajakta Lavangare-Verma ) आणि जिल्हाधिकारी आर. विमला ( Collector R. Vimala ) यांनी मेयो, मेडिकल, एम्समधील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची पाहणी ( Inspection of Oxygen Generation Projects ) केली. ओमायक्रॉनचा प्रसार वेगात होत असल्याने ऑक्सिजन प्रकल्पांचे काम आणि आवश्यक सुविधा 10 दिवसांत पूर्ण करा, असे आदेश दिले आहेत.

Review of Oxygen Generation Projects
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा आढावा

कोविडच्या ओमिक्रॉन (Omicron ) या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( Medical ), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय ( Meyo) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( All India Institute of Medical Sciences Nagpur ) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत. मेडिकलमध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात आले असून यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा दहा डिसेंबरपूर्वी करावा. ऑक्सिजन निर्मिती प्लांट पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला दिनांक 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने आवश्यक बांधकाम व विद्युत जोडणी पूर्ण करावी. ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाही करावी. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेडिकल अभियंत्याच्या सेवा घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

Review of Oxygen Generation Projects
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा आढावा

एम्स मध्ये चार ऑक्सिजन प्लांट -

‘एम्स’मध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा ( Oxygen Supply )सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्धारित कालमर्यादेत सर्व ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी केल्या.

Oxygen Generation Projects
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ऑक्सिजन प्लांट

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसोबतच ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात मेयो, मेडिकल येथे प्रत्येकी दोन तर ‘एम्स’मध्ये चार पीएसए प्लांट सुरु करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले. ‘मेयो’मध्ये ऑक्सिजनचे दोन पीएसए प्लांट बसविण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक असलेले विद्युत रोहित्र व शेड बसविण्याचे काम सुरु आहे. ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

Review of Oxygen Generation Projects
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा आढावा

दर आठवड्यात ऑडिट करा -

ऑक्सिजन निर्मिती संदर्भात वैद्यकीय विभागातर्फे निश्चित कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार दर आठवड्याला ऑक्सिजन ऑडीट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मेयो हॉस्पिटलला आवश्यक असलेले अल्ट्रा सॉनिक कॅमेरा खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

Last Updated : Dec 3, 2021, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.