ETV Bharat / city

Balasaheb Thorat Criticized BJP : भाजपाचे विचार आणि कार्यप्रणाली देशाच्या हिताची नाही - बाळासाहेब थोरात - भाजपाचे विचार देशाला घातक बाळासाहेब थोरात

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत सातत्याने निधीचा विषय कॅबिनेटमध्ये मांडत आले आहे. मात्र फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे त्यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ( Chief Minister Uddhav Thackeray ) पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर हा विषय घालावा लागला. शिवाय भाजपा पक्ष ( BJP Party ) देशासाठी घातक असल्याचे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेब थोरात संग्रहित फोटो
बाळासाहेब थोरात संग्रहित फोटो
author img

By

Published : Jan 25, 2022, 3:26 PM IST

Updated : Jan 25, 2022, 3:35 PM IST

नागपूर - ऊर्जा मंत्रालयाला निधी उपलब्ध करून न दिल्यास राज्य अंधारात जाण्याची भीती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत ( Energy Minister Dr. Nitin Raut ) यांनी व्यक्त केली आहे. राज्य अंधारात गेल्यास यासाठी केवळ ऊर्जामंत्री म्हणून नितीन राऊत आणि काँग्रेस पक्षाचे नेत्यांना जबाबदार धरू नये, तर महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) जबाबदार राहील, असे वक्तव्य त्यांनी केलेले आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत सातत्याने हा विषय कॅबिनेटमध्ये मांडत आले आहे. मात्र फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे त्यांना पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह ( Chief Minister Uddhav Thackeray ) पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर हा विषय घालावा लागला. शिवाय भाजपा पक्ष ( BJP Party ) देशासाठी घातक असून त्यांची विचार आणि कार्यप्रणाली देशाच्या हिताची नसल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देतांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
  • नानांनी तो मोदी उभा केला तरी राजकारण सुरूच

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते, की मी मोदीला मारू शकतो, शिव्या सुद्धा देऊ शकतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने नाना विरुद्ध आंदोलन केले. त्यानंतर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले, की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोललो नाही, तर गावगुंड मोदी संदर्भात बोलत होतो. नानांच्या वक्तव्यातील तो गावगुंड मोदी समोर आल्यानंतर हा विषय इतेच संपायला हवा होता, मात्र या विषयाला धरून सुरू असलेल्या राजकारणात नांनाना व्यक्तिगत टार्गेट केले जाते आहे, असेही मत बाळासाहेब थोरांतानी व्यक्त केले आहे.

  • 'प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार'

भाजपा-शिवसेनेच्या 25 वर्षाच्या आघाडी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले मत केले आहे. 25 वर्ष शिवसेना आघाडीत सडली, मात्र आता शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले आहे. भविष्यात शिवसेना देशव्यापी पक्ष म्हणून पुढे येईल, असे देखील वक्तव्य त्यांनी केलेले आहे. यावर बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की सर्वांना आपला पक्ष मोठा करण्याचा अधिकार आहे. भाजपा हा देशासाठी हानिकारक आहे. शिवसेनेने वेळेवर धोका ओळखला असल्याचे ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे हे दिल्ली काबीज करायची भाषा करत असतील तर गैर नसल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

  • निवडणूक फायदा आणि तोटा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या त्यात आम्हाला काही फायदे काही तोटे झाले आहेत. आम्ही स्वतंत्र लढलो त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते निर्माण झाले. आता पुढे आम्ही पक्षातील नेते एकत्रित येऊन निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रियाही बाळासाहेब थोरातांनी दिली आहे.

हेही वाचा - Mumbai Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

Last Updated : Jan 25, 2022, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.