नागपूर: आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागपूर शहरासह (Returning Heavy Rains In Nagpur) विदर्भातील (Rain in Vidarbha)अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार पावसाचे आज पुनरागमन झाले आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढविली (Rain raised concerns of farmers) आहे. यामुळे हाती आलेली पिके कुजण्याचा धोका संभवत आहे.
नागरिकांची उडाली तारांबळ: रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे सकाळी शाळेत, महाविद्यालयात आणि ड्युटीवर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सकाळी पावसाने चांगलाच जोर धरला होता.
शेतकरी चिंतेत: परतीच्या पावसाने सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची सुद्धा डोकेदुखी वाढवली आहे. सोयाबिनचे पीक काढणीवर आले असताना आता पाऊस जोर धरत आहे; त्यामुळे उभं पीक संकटात येईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे. रब्बी पिकाच्या दृष्टीने हा पाऊस काहीसा फायद्याचा ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र ज्या काळात थंडी पडायला पाहिजे त्यावेळी पाऊस पडत असल्याने याचा विपरित परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे.