नागपूर- अल्पवयीन तरुणीने तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात ( Nagpurs Jaripatka police station ) दाखल केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत असणाऱ्या या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून भोपाळच्या तरुणाने तिचे लैंगिक शोषण केल्याचे त्या तरुणीने तिने दिलेल्या ( Rape on MP minor girl in Nagpur ) तक्रारीत म्हटले आहे. एवढेच नाही तर आरोपीच्या आईवरसुद्धा गंभीर ( serious allegation on accused mother ) आरोप केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार ती एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्ममध्ये कामाला आहे. ती कामाच्या निमित्ताने मे महिन्यात मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली होती. त्यावेळी तीची आरोपी अभिषेक कुरिल सोबत ( accused Abhishek Kuril ) भेट झाली. अभिषेकने पीडित तरुणीला विश्वासात घेऊन प्रेमाच्या जाळ्यात ( Nagpur crime news ) ओढले आणि तिच्यावर बलात्कार केला होता, अशी तक्रार पीडित तरुणीने आपल्या तक्रारीत दिली आहे. पीडित तरूणीने आरोपीकडे लग्नाचा तगादा लावला असता त्याने नकार दिल्याने तिने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
आरोपीच्या आईवर केले गंभीर आरोप अल्पवयीन पीडित तरुणीने जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीच्या आईवर ही गंभीर प्रकारचे आरोप केले आहेत. दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीला इतर ही पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले म्हणून आरोपीची आई रजनी यांच्या वरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, एवढेचं नाही तर तिचे अश्लील छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड केली असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.