नागपूर एकेकाळी विदर्भाकडे प्रादेशिक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते स्वतःच्या सोयीच्या राजकारणाचा पर्याय म्हणून बघायचे. मात्र, परिस्थिती त्या उलट झाली आहे. राज्यात सत्तेचा मार्ग विदर्भातूनचं जातो याची खात्री राजकीय पक्षांना झाली आहे, म्हणूनचं आता विदर्भाकडे दुर्लक्ष करणे किती नुकसानदायक ठरेल यांचे गणित लक्षात आल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे MNS President Raj Thackeray यांनी महाराष्ट्र दौऱ्याला विदर्भातुन सुरू करण्याचा निश्चित केले आहे. राज्यात राजकीय परिस्थिती बदलली आहे. सत्तेत असलेले पक्ष विरोधात आणि विरोधक सत्तेत गेल्याने राजकीय समीकरण देखील बदलले आहेत. त्याचा थेट फायदा विदर्भात मनसे मिळवण्याच्या बेतात आहे. विदर्भात शिवसेनेला पर्याय म्ह्णून मनसेने फासे टाकण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या विदर्भाकडे आता सर्वच राजकीय पक्षांनी अतिशय गांभीर्याने बघायला सुरुवात केली आहे. पुढील दोन वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होतील. त्याआधी विदर्भातील चार महानगरपालिका निवडणूक Municipal election होणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांचा कौल जाणून घेण्याची उत्तम संधी प्रत्येक पक्षाला आहे. एवढंच नाही तर विदर्भाच्या राजकारणात स्वतःची ताकत आणि क्षमता तपासण्याची संधी राजकिय पक्षांना तपासरा येणार आहे, म्हणूनचं राज्यातील प्रादेशिक पक्षांनी विदर्भाकडे लक्ष केंद्रित केलं आहे.
शिवसेनेला मनसेचा पर्याय संपूर्ण विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद तशी पाहिली तर नगण्यचं आहे, तर काही भागात शिवसेनेचे अस्तित्व अद्याप आपल्याला बघायला मिळते. मात्र,राजकीय परिस्थिती बदलल्या नंतर शिंदे गटाने आपली ताकद विदर्भात वाढवल्याने ठाकरे गटाला सुरुंग लागला आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीचा थेट फायदा मनसेला करून घ्यायचा आहे. विदर्भात शिवसेनेला मनसे पर्याय देत असल्यानेचं राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात विदर्भातुन करत आहेत, असे राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.
१८ पासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहुप्रतीक्षित विदर्भ दौऱ्याला 17 सप्टेंबर पासून सुरुवात होते आहे. राज ठाकरे 17 सप्टेंबर रोजी विदर्भ एक्सप्रेसने नागपूर करिता रवाना होतील. 18 सप्टेंबर रोजी त्यांचं नागपुरात आगमन होणार आहे. त्यानंतर दोन दिवस नागपूर, एक दिवस चंद्रपूर, आणि दोन दिवस अमरावतीचा दौरा करणार आहेत. एकूण सहा दिवसांच्या दौऱ्यात ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणूकांकडे लक्ष येत्या काळात विदर्भातील नागपूर,अमरावती आणि चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकांसह इतर निवडणुका होतील. त्या डोळ्यासमोर ठेवून मोर्चे बांधणी करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केली आहे. नागपूर अमरावती, अकोला आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवण्याची आमची तयारी असल्याचं देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.