नागपूर - केंद्रीय मंत्री असल्याने आज सुरक्षेचा फौजफाटा असला तरी भाजप पक्षाला सोनेरी दिवस येण्यापूर्वीच संघर्षमय इतिहास सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक किस्सा सांगितला. त्यात आंदोलनात पोलिसांनी इतके मारले होते की रक्ताच्या उलट्या होऊन रक्तबंबाळ झाले असल्याच ते सांगत होते. ते नागपूरात दिवाळी मिलननिमित्त आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते. विधानपरिषदेचे आमदार गिरीश व्यास यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांनी कार्यकाळाच्या अहवाल पुस्तिकेचे लोकार्पण सुरेश भट्ट सभागृहात केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, भाजपाला आज सोनेरी दिवस पाहायला मिळत आहे. त्यावेळचे मोजकेच लोक आज आहे. तो काळ संघर्षाची होता. पण कार्यकर्ते जुने झाले की मोडीत निघतात, पण भाजपी पक्षात तसे होत नाही असेही गडकरी म्हणाले.
कार्यकर्ता चतूर हवा, चत्रा नको -
भाजपमध्ये आज चांगले दिवस आले आहे. त्या काळात अनेक पदाधिकारी यांनी घेतल्या संघर्षमय परिश्रम त्यामुळे पायावर उभा झाला. त्यामुळे आज भाजप पक्षाला चांगले दिवस आलेत. पण हे चांगले दिवस ज्यांच्यामुळे आले तेही विसरू नये असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. गिरीश व्यास यांच्या विधान परिषदेचे कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांनी अहवाल पुस्तिका सादर करतांना त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाची आठवण गडकरी यांनी करून दिली. त्यांचे पक्षासाठी कामाचे योगदान पाहता त्यांना आमदारकी दिली. त्यांनी आमदारकीची तिकीट मागितली नव्हती. आम्ही एका कार्यकर्त्यावर त्याचा कामाची चीज केली आणि आम्ही ती चूक केली असे झाले असते. त्यामुळे गिरीश व्यास यांना आमदारकी देण्यात आली. आज जो प्रामाणिकपणे गिरीश व्यास यांच्यामध्ये आहे, तो आजच्या राजकारणात नसते असेही ते म्हणाले. तसेच कार्यकर्ता चतुर असला पाहिजे पण चत्रा नको, गिरीश व्यास यांनी एका कार्यकर्त्यांच्या कसोटीत राहून काम केले.
सेवानिवृत्त केव्हा घ्यावी यावर काय म्हणाले गडकरी -
काल असते ते आज नाही आणि आज असते ते उद्या नाही. सुनील गावस्कर यांनी कलत्तात येथे 98 रन काढले. ब्रॅडमनचा रेकॉर्ड तोडावा अशी अपेक्षा असतांना विश्वविक्रम बनण्यासाठी पात्र असतांना त्यानी निवृत्त होण्याची घोषणा केली. त्याव गावस्कर यांना प्रश्न विचारला की तुम्ही निवृत्ती का घेतली तुमचा परफॉमस अजून टिकून आहे. एक वर्ल्ड रेकॉर्ड बनण्यासाठी तुम्ही खेळू शकले असते. पण त्यावर उत्तर देतांना गावस्कर म्हणाले की लोक जेव्हा हे विचारतात तुम्ही निवृत्त का होतात तेव्हाच निवृत्त होण्यात मजा आहे. केव्हा होणार असे विचारता तेव्हा निवृत्त होण्यात मजा नाही, असा तो किस्सा त्यांनी यावेळी बोलून दाखवला. हा किस्सा सांगताना गिरीश व्यास यांनी निवृत्त व्हावे असे नाही, पण पक्षाच्या कामात स्वतः झोकून पक्षातील कार्यात सहभाग नोंदवा, कारण सत्तेच्या राजकारणात मर्यादा असतात. त्यांचा अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकेल त्यांनी ते काम कायम करत राहवे असेही ते म्हणालेत.
जुन्या कार्यकर्त्यांची आठवण -
आज जुने कार्यकर्ते कोणी राहिले नाहीत. आम्हाला अनेक मोठं मोठी पद मिळाली, पण तरीही काहींना काहीच मिळाले नसतांना तोच आनंद कायम ठेवून भाजप पक्षाची ताकद वाढवण्यासाठी ते लोक काम करत राहावे. आम्ही वेळ प्रसंगी लाठ्या खल्ल्या, काहींना मारले असेही ते सांगत होते. यावेळी गडकरी म्हणाले एका आंदोलनात तर पोलिसांनी रक्तबंबाळ होतपर्यंत पोलिसांनी मारले, पण यातून कार्यकर्ते घडले, हा भाजप पक्षाचा संघर्षाचा इतिहास आहे. या सोनेरी काळाचे साक्षीदार पाहिले, पण इतिहासातील तो शेवटचा कार्यकर्ता गिरीश व्यास आहे असेही नितीन गडकरी म्हणाले.