ETV Bharat / city

नागपुरात कोरोना नियंंत्रणासाठी शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू - नागपूर जनता कर्फ्यू

नागपूर शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाने येत्या शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे आयोजन केले आहे.

Public curfew
जनता कर्फ्यू
author img

By

Published : Sep 16, 2020, 8:41 PM IST

नागपूर - सध्याच्या परिस्थितीत उपराजधानी नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे, त्याच बरोबर नागपूरचा मृत्यूदर देखील वाढत असल्याने येत्या शनिवार आणि रविवारी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर पुढील शनिवारी आणि रविवारी सुद्धा जनता कर्फ्यू असेल असा निर्णय महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नागपुरा शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू
सध्या नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाला रोखण्यात प्रशासनाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असल्याने आज महानगरपालिकेत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे शहरातील सर्व आमदार, महापौर आणि पालिका आयुक्त सहभागी झाले होते. यामध्ये कोरोना रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली, मात्र तरी देखील कोरोनाच्या प्रसार वेगाने सुरू असल्याने शहरात शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.