ETV Bharat / city

nylon manja ban - नायलॉन मांजामुळे होणाऱ्या घटना अपघात नसून हल्लाच, प्राध्यापकाची भावना; बंदीची मागणी

नायलॉन ( nylon manja ban ) मांजामुळे होणाऱ्या दुखापती किंवा जीव जाण्याच्या घटना अपघात नसून एक प्रकारचा हल्ला आहे, अशी भावना गंभीर जखमी झालेल्या प्राध्यापकाने व्यक्त केली आहे. डॉ. राजेश क्षीरसागर असे त्यांचे नाव. एका घटनेत मांजामुळे त्यांच्या गळ्याला आणि दोन बोटांना दुखापत झाली होती.

author img

By

Published : Dec 20, 2021, 5:18 PM IST

professor injured by manja nagpur
नायलॉन मांजा बंदी राजेश क्षीरसागर

नागपूर - नायलॉन ( nylon manja ban ) मांजामुळे होणाऱ्या दुखापती किंवा जीव जाण्याच्या घटना अपघात नसून एक प्रकारचा हल्ला आहे, अशी भावना गंभीर जखमी झालेल्या प्राध्यापकाने व्यक्त केली आहे. डॉ. राजेश क्षीरसागर असे त्यांचे नाव. एका घटनेत मांजामुळे त्यांच्या गळ्याला आणि दोन बोटांना दुखापत झाली होती. मांजाच्या धोक्याबाबत ते काय म्हाणाले आणि त्यांची मागणी 'ईटीव्ही भारत' च्या प्रतिनिधीने जाणून घेतली.

माहिती देताना डॉ. राजेश क्षीरसागर आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Maharashtra Weather : राज्य थंडीने गारठले; पाहा या शहरातील तापमान

नागपूर जिल्ह्यात मकरसंक्रांत हा सण जवळ येताच बंदी असलेल्या नायलॉन मांजमुळे मोठ्या प्रमाणात जखमी आणि जीव जाण्याच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना नागपूरच्या म्हाळगी नगर भागात राहणारे राजेश क्षीरसागर यांच्यासोबत घडली. ते हेल्मेट घालून दुचाकीने कळमेश्वर येथून परत येत होते. या प्रवासादरम्यान सदर भागातील उड्डाणपुलावरून त्यांच्या गळ्यात काहीतरी अडकल्याचे जाणवले. त्यांनी वाहन थांबण्याचा प्रयत्न केला असताना सहज हाताने काय अडकले हे पाहताना त्यांच्या उजव्या हाताचा मधला बोट आणि अंगठा कापल्याचे त्यांना दिसून आले. दोन्ही बोटांना दुखापत होऊन रक्ताची धार लागल्याने ते घाबरले. त्यांच्या दुचाकीवर पाठीमागे असलेल्या मित्राला खांद्याला दुखापत झाली होती. एका वाटसरूच्या मदतीने रुग्णालय गाठत त्यांनी उपचार केले. तेव्हा डॉक्टरांनी गळ्याला मांजामुळे गंभीर दुखापत झाली असून आणखी काही क्षण मांजा गळ्याभोवती राहिला असता तर त्यांना जिवाला मुकावे लागले असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या दोन्ही बोटांवर छोटी शस्त्रक्रिया करावी लागली. यात गळ्यावर आलेले संकट हातावर निभावले असले तरी, दरवर्षी या घटना पाहता नायलॉन मांजाची विक्री थांबत नाही. त्यामुळे, मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी. आज माझा जीव वाचला, पण पुढे या घटना थांबवायच्या असल्यास असे हल्ले थांबवले पहिजे. कारण बंदी असलेला मांजा विकणे आणि पतंग उडवणे या दोन्ही बाबीकडे मनपा प्रशासन आणि पोलिसांनी जातीने लक्ष देऊन जण सामान्यांचेच नाही, तर पशू पक्षांचेसुद्धा जीव वाचवले पाहिजे, अशी विनवणी डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केली.

पोलीस चौकीमागेच चालत होती विक्री

नागपूरच्या गुन्हे शाखेकडून नुकतीच एक कारवाई करण्यात आली. यामध्ये चक्क पाचपावली पोलीस चौकीच्या मागे असलेल्या एका ठिकाणाहून बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 707 चकऱ्या नायलॉन मांजाचा समावेश होता. 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे, पोलीस चौकीच्या मागेच नायलॉन मांजा विकला जात असताना स्थानिक पोलिसांनी याची माहिती मिळत नसेल, तर लोकांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही, हे खरे. त्यामुळे, याकडे जातीने लक्ष दिले तरच जीवघेण्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर वचक बसवता येईल, यात शंका नाही.

हेही वाचा - ... अन्यथा कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात येऊ देणार नाही, युवासेनेचे नागपुरात आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.