नागपूर - कोरोनाच्या ओमीक्रॉन या नवीन व्हेरीयंटमुळे ( Omicron Variant ) संभाव्य परिस्थितीचा अंदाज घेत नागपूर मनपाच्या हद्दीतील प्राथमिक शाळा ( Nagpur Municipal Corporation Primary Schools ) सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. यामुळे नागपूर मनपा प्रशासनासाच्या हद्दीतील शाळा तूर्तास सुरू होणार नाही, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ( Municipal Commissioner Radhakrishnan b ) यांनी स्पष्ट केले आहे. पुढील 10 दिवस परिस्थितीचा अंदाज घेऊन 10 नोव्हेंबर नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी सावध भूमिका घेतली आहे. मात्र ग्रामीण भागातील वर्ग 1 ते 4 ची शाळा आजपासून सुरू होत आहे.
पालकांमध्ये भीती -
शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने ( State Government ) घोषणा केली असली तरी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा सूचना केल्या आहे. त्यामुळे मुंबई पुणे मनपा प्रशासनाच्या सावधगिरी प्रमाणे लहान मुलांच्या अनुषंगाने 1 ते 7 व्या वर्गाची शाळा सुरू करण्यासाठी नागपूर मनपा प्रशासनाने बैठक घेऊन यावर निर्णय घेतला. पालकांमध्ये सुद्धा ओमीक्रॉनमुळे मुलांना शाळेत पाठवण्यासाठी भीती होती. त्यामुळे महानगर पालिका यावर निर्णय घेत 10 नोव्हेंबर पर्यंतच्या परिस्थितीचे अवलोकन करणार असल्याचे मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी ( Ram Joshi ) यांनी सांगितले. त्यामुळे या 10 दिवसात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यास आणि कुठलाही धोका नवीन व्हेरियंटचा ( New Variant ) नसल्याने शाळा सुरू होऊ शकेल अशी शक्यता आहे. पण कोरोनाची परिस्थिती बिघडल्यास शाळा सुरू करण्याचा कालावधी आणखी वाढू शकेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामीण भागातील शाळा सुरू -
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील ( ZP School ) प्रथमिक शाळेच्या परिस्थितीचा अंदाज घेत वर्ग 1 ते 4 वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विमला आर ( Collector Vimala R. ) यांच्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी प्राथमिक शाळा सुरू होणार आहे. यात आजपासून ग्रामीण भागातील 1 हजार 522 शाळा असून 70 हजार 483 विद्यार्थी आहे. यासोबत नगर परिषदेचे 61 विद्यार्थी असून 8497 विद्यार्थी आहे. 439 विना अनुदानित शाळा असून यात विना अनुदानित आणि अनुदानित शाळेतसुद्धा मोठ्या संख्यने विद्यार्थी आहे. नागपूर मनपा क्षेत्रातील प्रत्यक्ष वर्ग 1 ते 8 पर्यन्त शाळा सुरू होणार नसल्या तरी शाळेला ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करता येणार आहे. त्यामुळे वर्गखोलीत भरणारी शाळा सुरू करण्यावर आलेले बंधन सुटतात का 10 नोव्हेम्बर नंतर स्पष्ट होईल.