नागपूर : नागपूरच्या महाल परिसरात ( In The Mahal Area of Nagpur ) शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel Eknath Shinde ) यांच्या समर्थनार्थ आज वीर बजरंगी सेवा संस्थानच्या महेश झाडे ( Mahesh Zade of Veer Bajrangi ) यांनी महाल शेजारी असलेल्या चितारओळी भागात एक बॅनर लावलं होतं. मात्र, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेच्या बॅनरला काळे फासून बॅनर फाडले आहे.
एकनाथ शिंदे समर्थनार्थ लावले होर्डिंग : महाल परिसरातील चितारओळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ होर्डिंग लावण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयापासून केवळ 400 मीटरच्या आत हा परिसर येतो. या ठिकाणी महेश झाडे या बजरंगी सेवा संस्थानच्या कार्यकर्त्याने चितारओळी परिसरात सकाळी बॅनर लावले होते.
युवा सेना कार्यकर्त्यांनी फाडले बॅनर : याबाबतची माहिती दुपारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना समजताचं त्यांनी एकनाथ शिंदेच्या बॅनरवर काळी शाई लावून बॅनर फाडून निषेध नोंदवला आहे. यानंतर शिवसेना बंडखोरांचे बॅनर लावल्यास युवा सेना आक्रमक ( Shiv Sena On Action Mode ) होऊन बॅनर फडण्याचे काम करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय लिहिलं होतं बॅनरवर : सध्याच्या नाट्यात शिंदे गटाचे पारडे जड होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात नागपुरातदेखील बॅनर झळकले होते. त्यामध्ये "राजतिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी"."लोकांचा लोकनाथ एकनाथ" असा आशय या बॅनरवर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे, असे लिहून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेचं बंड, शिवसैनिकांची तोडफोड; मुंबईत 'या' तारखेपर्यंत जमावबंदी लागू