नागपूर - पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी घराच्या गणपतीला महानगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या फुटाळा तलावावरील कृत्रिम हौदात विसर्जन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांचे पालन सामान्य नागरिकांना असते असून त्याच नियमाचे पालन करून अमितेश कुमार यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. नागरिकांनीही कृत्रिम हौदात गणरायाचे विसर्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यासाठी शहरात 248 कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहे. नागपुरात शहरातील विविध भागांतील झोन नुसार हे कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहे. नागरिकानी त्यांच्या भागात त्या ठिकाणी हौदात विसर्जन करावे, असे आवाहन केले आहे. शहरात 248 हौद तयार करण्यात आले आहे. शिवाय फिरते हौद ही संकल्पनाही राबवण्यात आली आहे. शहरात फुटाळा तलाव, गांधी सागर तलाव, सोनेगावे तलाव याठिकाणी घरगुती गणपती ज्यामध्ये साधारण 25 हजार गणपती आहे. विसर्जन केले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणत तलावाचे पाणी दूषित होण्यापासून वाचले आहे.
शहरात गणराया बाप्पाला विसर्जन करण्यासाठी महानगर पालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी कुत्रीम हौद तयार केळवे आहे. त्याच ठिकाणी निर्माल्य टाकण्याची सोय केली आहे. तसेच शहरात गणेश विसर्जनाच्या काळात मिरवणूक काढण्यावर निर्बंध असले तरी अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जवळपास 3 हजार 500 पोलीस तेच वाहतूक व्यवस्था बिघडू नये. यासाठी 500 च्या जवळपास वाहतूक पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी महानगर पालिका आणि प्रशासनाकडून घालण्यात आले निर्बंध याचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा - वेडसर महिलेसाठी देवदूत ठरले नागपूर पोलीस; वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने महिलेची सुखरूप प्रसूती