ETV Bharat / city

राजेश श्रीवास्तव यांच्या आत्महत्येचं गुड कायम; फॉरेन्सिक अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा

छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूजा लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे.

nagpur police
तपास करताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Mar 4, 2021, 4:46 PM IST

Updated : Mar 4, 2021, 4:55 PM IST

नागपूर - छत्तीसगड सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केली आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूजा लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. राजेश श्रीवास्तव असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसंचालक पदावर कार्यरत होते. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

नवीनचंद्र रेड्डी - सहायक पोलीस आयुक्त, नागपूर

या संदर्भात सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळावरून काही लिक्विड (द्रव्य) जप्त केलं आहे. ते काय आहे हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे. मृतक श्रीवास्त यांचे कुटुंबीय नागपुरात दाखल झाले आहेत.

राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड राज्यात कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक पदावर कार्यरत होते. काल रात्री त्यांचा मृतदेह सीताबर्डी पूजा लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. त्यांच्या खोलीत विषारी पावडरच्या दोन पुड्या मिळून आल्या आहेत. राजेश श्रीवास्तव हे दोन मार्च रोजी तारखेला नागपूर च्या पूजा लॉज मध्ये आले होते. मात्र काल ते लॉज मध्ये असताना बराच वेळ त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना संशय आला त्यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने खोलीचं दार तोडण्यात आलं तर ते मृतावस्थेत आढळून आले होते. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

श्रीवास्तव नागपुरात आले कसे?

राजेश श्रीवास्तव हे एक मार्च रोजी त्यांच्या पत्नी सोबत त्यांच्या कार्यालयात गेले होते अशी माहिती पुढे आली आहे. काही वेळ त्यांच्या कार्यालयात होते,त्यानंतर ते तिथून अचानक बेपत्ता झाले होते. ते घरी देखील न पोहोचल्याने त्यांच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली मात्र राजेश श्रीवास्तव हे नागपूरला पोहचले होते. एकीकडे श्रीवास्तवचे कुटुंबातील सदस्य त्यांचा शोध त्यांचा शोध रायपूर सह छत्तीसगड मध्ये घेत असताना ते नागपूरात कसे आलेत या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्हीची तापसणी करणार -

राजेश श्रीवास्तव हे छत्तीसगड शासनात कोषागार विभागाचे सहसंचालक पदावर कार्यरत होते. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या अधिकारी अतिशय सामान्य अश्या लॉज वर कसे आलेत, त्यांच्या सोबत आणखी कुणी होत का या संदर्भात लॉज जवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलीस करत आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

हेही वाचा - मुंबईत पुन्हा छापेमारी, चित्रपट निर्माते मधू वर्मा मंटेना यांच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र

Last Updated : Mar 4, 2021, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.