नागपूर - प्रत्येक गुन्हेगार काहीतरी पुरावा मागे ठेवून जातो. मात्र, नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिसांनी ( Hudakeshwar police action on thieves ) कोणताही पुरावा मागे न सोडलेल्या चोरांना अटक केली आहे. दोघांच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसताना ते पोलिसांच्या जाळ्यात आयते अडकले, यामागे एक रंजक घटना कारणीभूत ठरली आहे.
दोन तरुण एका बारमध्ये दारू पिण्यासाठी आले होते. ते दोघेही दारुवर मोठा खर्च करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या पैश्यातून दारु पिण्याचा शौक पूर्ण करत असल्याचा खुलासा केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोमेश्वर कान्होलकर आणि प्रीतम उईके असे आरोपींची नावे आहेत. ते पोलिसांच्या रेकॉडवरील गुन्हेगार आहेत.
179 ग्रॅम सोने आणि 18 हजार रुपये पळविले होते-
एखाद्या सिनेमातील कथानकाला शोभेल असेच या घटनेचे कथानक आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या ( Hudakeshwar Police ) हद्दीतील राधानंद नगरमध्ये राहणारे झाडे नामक व्यक्ती त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा घरी परत आले तेव्हा घराचे मुख्य दार उघडले दिसले. घराच्या आत जाऊन बघितले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घरातून 179 ग्रॅम सोने आणि 18 हजार रुपये नगदी चोरून ( Nagpur crime news ) नेले होते. त्याच पैशांतून दारू पिताना पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
चोरीच्या पैशातून सुरू होती मौज
आरोपी सोमेश्वर कान्होलकर आणि प्रीतम उईके हे दोघेही दारूवर भरपूर पैसे उधळत असल्याची माहिती हुडकेश्वर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून समजली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी झाडे यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या पैशातून ते दारू ढोसत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी सांगितले.
हेही वाचा-100 Crore Recovery Case : अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला.. पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी