ETV Bharat / city

Sextortion Case : सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा वापर; अधिकाऱ्याला मागितली एक कोटीची खंडणी, २८ लाख घेताना आरोपी रंगेहात पकडला - A ransom of one crore

सेक्सटॉर्शनसाठी पत्नीची वापर ( use of wife for sexual abuse ) करुन अधिकाऱ्याकडून एक कोटीची खंडणी ( A ransom of one crore ) मागणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीने अधिकाऱ्याकडून 28 लाख रुपये उकळले होते. मात्र ते घेतानाच पोलिसांनी रंगेहात त्याला पकडले आहे.

extortion
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 11, 2022, 1:48 PM IST

Updated : Jul 11, 2022, 4:07 PM IST

नागपूर - सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा ( use of wife for sexual abuse ) वापर करुन अधिकाऱ्याकडून एक कोटीची खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमित सोनी असे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव असून तो छत्तीसगडमधील राजनांदगावचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला 28 लाख रुपयाचा पहिला हप्ता घेताना सदर परिसरातील एका हॉटेलमधून रंगेहात पकडले आहे.

सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा वापर

अधिकाऱ्याने महिलेला पाठवले अश्लील छायाचित्र - शहरातील एक अधिकारी अमित सोनी आणि त्याच्या पत्नीला ओळखतात. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांची आरोपी अमितच्या पत्नीसोबत चॅट सुरू होती. यावेळी आरोपी अमित आणि त्याच्या पत्नीने पीडित अधिकाऱ्याला अश्लील छायाचित्रे आणि मॅसेज पाठविले. त्यानंतर त्या पीडित अधिकाऱ्यालाही अशाच प्रकारची छायाचित्रे आणि चित्रफीत पाठविण्यासाठी बाध्य केल्याचा अधिकाऱ्याचा दावा आहे. त्या अधिकाऱ्याने स्वतःचे काही अश्लील छायाचित्र महिलेच्या मोबाईलवर पाठवले होते.

१ कोटीची केली मागणी - अधिकारी आपल्या जाळ्यात अडकल्याची खात्री पटल्यानंतर अमितने त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. तुमची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफीत आमच्याकडे असून ती तुमच्या नातेवाइकांमध्ये व्हायरल करू अशी धमकी त्याने अधिकाऱ्याला दिली. ती व्हायरल न करण्यासाठी एक कोटीची खंडणीही मागितली. मात्र खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार ऐकून अधिकारी चक्रावून गेला.

२८ लाखांचा पहिला हफ्ता - १ कोटी रुपयांची एवढी मोठी रक्कम देण्यास संबंधित अधिकाऱ्याने असमर्थता दर्शविली. तेव्हा अमितने त्यानंतर अधिकाऱ्यांकडे ७० लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिल्या हप्त्यात २८ लाख रुपये द्या, यावेळी तुम्हाला छायाचित्रे व चित्रफित देऊ असे अमित म्हणाला. आपल्याला छायाचित्र मिळतील त्यामुळे सदर अधिकाऱ्याने 28 लाखाचा पहिला हप्ता अमीतला देण्याचे ठरवले.

अधिकाऱ्याने घेतली पोलीसात धाव - अधिकाऱ्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली. अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेला कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला नागपूरच्या सदर परिसरातील एका हॉटेलमध्ये सापळा रचला. यावेळी अमीतला २८ लाखांची रोख घेताना पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे.

हेही वाचा - Cannabis Seized In Solapur : सोलापुरात पन्नास लाखांचा गांजा जप्त; सांगोला पोलिसांची मोठी कारवाई

Last Updated : Jul 11, 2022, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.