नागपूर : इंजिनिअरिंगच्या दोन मित्रांना एक उद्योग सुरू असताना गप्पा करता करता दुसऱ्या उद्योगाची आयडिया सुचली. ती आयडिया जरा खास होती. कारण हा व्यवसाय दिवसाच्या उजेडातील नसून, सर्वजण गाढ झोपेत असतात रात्रपाळीत काम करणाऱ्यांना गरमागरम तर्री पोह्याच्या नाश्ता देण्याची ही आयडिया होती. पण, याच आयडियामुळे 2018 मध्ये रात्रीच्या अंधारात सुरू झालेला हा 10 बाय 10 च्या खोलीतील व्यवसाय आता प्रकाशझोतात आला. याच व्यवसायाला ग्लोबली पोहचवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. सुरू झाला "पोहेवालाचा प्रवास" कोण आहेत हे तरुण आणि काय आहे पोहेवाला नावाचा स्टार्टअप जाणून घेऊ या विशेष रिपोर्टमधून.....
दोन तरुणांचा थक्क करणारा प्रवास : तुम्ही नाश्त्याचे अनेक दुकाने पाहिले असतील. एकीकडे नोकरी नाही हजारो लाखो विद्यार्थी दरवर्षी डिग्री घेऊन विनानोकरीचे असतात. पण, या दोन तरुण मित्रांनी वेगळा आदर्श घालून दिला. यासाठी अगदी रोजच्या जीवनात नाश्त्याचे पोहे यशाचे गमक ठरत आहे. टपरीवरचे गरम पोहे, वाफाळलेली तिखट चव असलेले सावजी तर्रीचे नागपूरकर प्रेमी आहेत. याच पदार्थांचे चाहते ओळखून मूळचा भंडारा जिल्ह्यातील पवन आणि नागपूरच्या चाहूल या दोघांनी 'पोहेवाला' नावाने स्टार्टअप सुरू केला. याच विदर्भातील तर्री-पोह्याला ग्लोबल स्वरूप देण्यासाठी याची फ्रांचयजी देशभरातील प्रमुख शहरात सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. देशाची राजधानी दिल्लीत 2020 मध्ये फ्रांचायजी सुरू झाली. पण कोरोनाचे संकट आले आणि काही दिवसात ते बंद करावे लागले. पण, लवकरच मुंबई, इंदोर, पुणे यांसह अन्य महत्त्वाच्या शहरात विस्तार करणार असल्याचे चाहूल आणि पवन सांगतात.
काय आहे विशेषत: पोहेवालाची : इथे मिळणारे पोहे हे उच्चतम क्वाॅलिटी आणि टेस्ट यावर भर देऊन बनवतात. त्यामुळे इतर ठिकाणी मिळत असलेल्या पोह्यांपेक्षा इथल्या पोह्यांचे वेगळेपण आहे. बाजारात मिळणारे पोहे न वापरता मोठा आणि न तुटणाऱ्या दाण्याचे खास पोहे ते उपयोगात आणता असल्याचे सांगतात. याच पोह्यांवार सावजी तिखट रस्सा द्यायचा म्हणून त्यात खास मसाले त्यांनी तयार केले असे सांगतात. त्यामुळे पोटाला त्रास होणार नाही शिवाय लहान मुलांपासून तर वयोवृद्ध यांच्यापर्यंत कोणाला सहज पोहे खाता येईल अशा पद्धतीने पोह्याची तिखटपणा ठेवला आहे. अजूनही नवनवीन करण्यासाठी संशोधन सुरू असल्याचे पवन सांगतो.
लवकरच काळे पोहे मिळणार : पोह्यात त्यांनी ऑरगॅनिक तांदळापासून तयार होणारे ऑर्गनिक पोहे घेऊन लवकरच नवीन पध्दतीचे पोहे सुरू करणार असल्याचे सांगतात. यातून विशेष म्हणजे काळे पोहे हे लवकरच ग्राहकांना खायला मिळणार आहे. हे पोहे पैष्टिक असणार आहे. काळ्या रंगासोबत ब्राऊन रंगाचेही पोहे ग्राहकांच्या प्लेटमध्ये देण्यास सुरवात होणार आहे. सध्याच्या घडीला पोहेवालामध्ये तर्री पोहा, पनीर पोहा, इंदोरी पोहा, मिसळ पोहा, साधा पोहे असे पाच प्रकारचे पोहे पोहे प्रेमींना मिळत आहे. नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशनच्या जवळ एक आऊटलेट सुरू आहे. यात मुंबई दादर आणि भिलाइला पुढच्या महिन्यात दोन आऊटलेट सुरू होणार असल्याचे चाहूल आणि पवन सांगतो.
पोहेवाला व्यवसाय करणार ग्लोबल : शार्क टॅंक इंडियाच्या माध्यमातून पोहेवाला ही संकल्पना देशातील नामांकित कंपनीचे यशस्वी सीईओ समोर मांडणार आहे. पुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनात पोहेवाला या आऊटलेटला ग्लोबल स्वरूप देण्यासाठी आणि त्यातून मदत मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. शोच्या माध्यमातून एक कोटी लोन मिळवत ते इक्विटी देऊन मेंटरशिपच्या माध्यमातून पोहेवाला ब्रँड हा सातासमुद्रापार नेण्याचे त्यांचा मानस आहे. त्यांच्या या प्रयत्नांसाठी ईटीव्ही भारतच्या शुभेच्छा.
हेही वाचा : भारतीय वंशाच्या संशोधकाने अॅपल चिपमध्ये शोधला नवीन हार्डवेअर