नागपूर - आंबेडकरी आंदोलनातील कार्यकर्ते आणि कवी महेंद्र गायकवाड लिखित काजव्यांच्या खांद्यावर संगिनी या कवितासंग्रहातील पशु नावाची कविता मुंबई विद्यापीठाच्या बीए अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. २००२ साली महेंद्र गायकवाड Mahendra Gaikwad poet Nagpur यांनी या कविता संग्रह प्रकाशित केला आहे. आजवर त्यांचे १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये चार कविता संग्रहाचा समावेश आहे. अस्तित्व गमावलेली माणसे हा त्यांचा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
पशु कविता : बालपणी माझ्यावर प्रेम करणारी माणसं कधीकधी हिंस्र प्राण्यांचा धाक दाखवायची... मी निवांत..चिडीचूप! जीव मुठीत घेऊन हळुवार पावले टाकीत त्यांच्या कुशीत लपायचो ते गेले की मन फक्त खेळायचो, बागडायचो. आता मी प्रौढ आहे. हिंस्त्र प्राण्यांची धास्ती मुळीच वाटत नाही पण, माझ्यासाठी ढाल होणारी माणसं केव्हा कुडतडतील हेच सांगता येत नाही.
महेंद्र गायकवाड यांच्या कवितांचा भावार्थ : महेंद्र गायकवाड यांनी रचलेल्या अनेक कवितासंग्रहांचं प्रकाशन झालेला आहे. त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू हा माणूस आहे. आपली माणसं आपली असतात असे नाही, स्वार्थी घरभेदी, मुखवटे, परिधान करणारी माणसे केसाने गळा कापतात. माणुसकीचे सत्व नष्ट होते अशा समाजभान राखणारी त्यांची कविता आहे. रोजच्या व्यवहारी जीवनात बदलणाऱ्या घडामोडीचा आलेख वेदनादायी आहे. ग्लोबल जागतिक करण खाजगीकरणाने जनसामान्य गरीब मजूर कामगाराची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अशाही परिस्थितीत कविता आव्हाने स्वीकारते आणि पेलेविते. माणसांचे शोषण आणि अन्याय अत्याचाराचे बहुरूपीत्व शोधणारी कविता व्यवस्थित उभी राहते. अरे ला कारेच्या मुजोरी विध्वंसक भाषेला विधायक उत्तर देणारी समय सम्यक कविता वैयक्तिक मूल्यांचा उद्घोष करते असं महेंद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
हेही वाचा - Dahi Handi festival भाजपकडून मुंबई महापालिका टार्गेट, तब्बल ३७० ठिकाणी दहीहंडीचे केले आयोजन