नागपूर - नागपुरात कोरोनाची आतापर्यंतची सर्वाधिक ३ हजार ७९६ एवढी रुग्णसंख्या गेल्या २४ तासात नोंदविल्या गेली आहे. मात्र, तरीही नागरिकांना याचं गांभीर्य नसल्याचं दिसून येतंय. शहरातील कळमना कृषी उत्पन्न बाजारपेठेतील फ्रुट मार्केट मधील गर्दी बघून कोरोना संपला की काय अशी शंका येते. या मार्केट मध्ये फळांची बोली लावताना खरेदीदारांची अक्षरशः झुंबड उडाली. अनेकांनी मास्क घातला नाही. तर अनेकांचा मास्क तोंडाखाली आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज-
नागपूर जिल्ह्यात कोरोनाची भयावह परिस्थिती आहे. आतापर्यंतची सर्वांत जास्त रुग्णसंख्या गेल्या २४ तासात नोंदविल्या गेली आहे. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. दुपारीनंतर आवश्यक वस्तूंचे दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अशात नागरिकांची ही गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी आहे. त्यामुळं इतरांसाठी नाही किमान स्वतःसाठी तरी काळजी घेण्याची गरज आहे. पोलीस आणि महापालिकेने सुद्धा अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.
हेही वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली