नागपूर - भारतासह जगभरातील मुसलमानांसाठी मक्का आहे तशी हिंदुंसाठी अयोध्या आहे, असे मत विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. रवींद्रनारायण यांनी ( VHP Chief Rabindra Narain Singh on Muslim ) व्यक्त केलं आहे. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. फाळणीनंतर भारतात कॅन्सरसारख्या वाढणाऱ्या मुस्लिम समाजावर केमोथेरपीची गरज आहे, असल्याचे मत त्यांनी (VHP chief on Muslim Religion ) व्यक्त केलं आहे.
विश्व हिंदू जनकल्याण परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यालयाचे भूमिपूजन विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्यश्री डॉ. रवींद्र नारायण सिंह यांच्या उपस्थित करण्यात आले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली. यावेळी आचार्य जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. हिंदू समाज मजबूत झाला पाहिजे. अन्यथा 50 वर्षानंतर अफगणिस्थानसारखी स्थिती भारतात निर्माण होईल. तेव्हा हिंदू समाज संपुष्टात येईल, असं देखील ते म्हणाले.
हिंदू धर्माप्रती सरकारची उदासीनता लपून राहिलेली नाही -
स्वातंत्र्यानंतर हिंदू धर्माप्रती सरकारची उदासीनता लपून राहिलेली नाही. हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हा समाज कमकुवत झाला आहे. आता नव्या पिढीला यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. भारतात मुस्लिम समाज हा कॅन्सरसारखा वाढत आहे. त्यामुळे हिंदू धर्माबाबत पूर्वीपासून असलेली उदासीनता आजही कायम आहे. परिणामी हिंदू कमकुवत झाल्यामुळे या कॅन्सरला रोखायचे असेल तर त्याच्यावर किमोथेरपीची गरज आहे, असे सिंह म्हणाले.