नागपूर - मागील आठवडाभरात कोरोनाच्या रुग्णससंख्येत वाढ झाली आहे. यात विदर्भातील सहा जिल्ह्याचा समावेश आहे. बुलढाणा अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. नागपूरात मागील 24 तासातील परिस्थिती पाहता 536 नविन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तेच 48 तासात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. यात मंगळवारी 6 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
विदर्भातील सहा जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप यामध्ये नागपुरात आठवडाभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांनी डोके वर काढले आहे. यात अगोदरच पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. तेच राज्याच्या तुलनेत नागपूरात मृत्यू दर अधिक असल्याने चिंतेत भर पडली आहे. जास्तीत जास्त चाचण्या करून संसर्ग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. यात नागपूरात 2 ग्रामीण भागात 2 तर, 2 बाहेर जिल्ह्यातील असे 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4242 जणांचा नागपूरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात 4405 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यात शहरात 3657 आणि 748 ग्रामीण रुग्णांचा समावेश आहे.शहरात 9 भागात कोरोना रुग्णसंख्या अधिक-
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. शहरातील काही हॉटस्पॉट होण्याच्या मार्गवर असताना खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांनी तात्काळ बैठक घेत उपाययोजनांसाठी पाऊले उचलले आहेत. शहरातील काही भाग ज्यामध्ये खामला, स्वावलंबी नगर, जयताळा, आयोध्यानगर, न्यू बिडी पेठ, वाठोडा, दिघोरी, जरिपटका, जाफर नगरमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचे लक्षात येताच उपाययोजना राबवायला सुरवात झाली आहे.
बैठकीत मुख्यमंत्री यांनी दिल्या सूचना-
यात मुख्यमंत्री यांनीही जिल्हाधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेत आढावा घेतला. यात समाजिक धार्मिक कार्यक्रम, मेळावे, लग्नसोहळे मोर्चे, बैठक यात समाजिक अंतर पाळण्यासह गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. गर्दीच्या स्थळ लक्षात घेऊन हॅन्डवाश सेंटर सुरू करावे, यासह मास्क आणि कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नागपूरात फिरते चाचणी व्हॅन उपलब्ध-
नागपूरात महानगर पालिकेच्या वतीने मोफत कोरोना चाचणी व्हॅन शहरात विविध भागात सोयीचे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे करण्यावर भर दिला जात आहे. यासह एखादया इमारतीत किंवा फ्लॅट सिस्टीम मध्ये रुग्ण आढळल्यास सर्वानाच चाचण्या बंधनकारक केल्या आहे. जर मान्य नसल्यास कठोर पावले उचलण्याच्याही सूचना मनपा आयुक्त राधकृष्ण बी यांनी दिल्या आहेत.
मंगलकार्यलय आणि लग्न संमारंभात नियमाचा भंग करणाऱ्यावर 37 हजाराचा दंड-
शहरात दूध फळ किंवा भाजीपाला, घरपोच सेवा देणाऱ्या पेपर हॉकर्स सह अन्य सेवा देणाऱ्या खासगी कंपन्यांचा कर्मचाऱ्यांचा संघटनांना सुचना देऊन त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. लग्नसोहळ्यात होणाऱ्या गर्दीवर मनपाच्या उपद्रव पथकाचा माध्यमातून नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यात आतापर्यंत जवळपास 37 हजाराचा दंड वसुली करण्यात आली आहे.
मेडिकलच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात कोरोनाची लागण-
सध्या मेडिकलचे अभ्यासक्रमाला सूरवात होऊ दोन आठवडे उलटत नाहीत. तेच 10 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बिनधास्त फिरणाऱ्यांनी यापासून धडा घेतला पाहिजे. दुर्लक्ष न करता सध्या काळजी घेण्याची गरज आहे.
पूर्व विदर्भात काय परिस्थिती-
यात सर्वाधिक रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात असून 535 रुग्ण आढळून आले. तेच सर्वात कमी 2 रुग्ण गोंदियात, वर्धा 62, भंडारा 21, चंद्रपूर 18 तर गडचिरोलीत 8 रुग्ण आढळून आले आहे. यात पश्चिम विदर्भातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यात पूर्व विदर्भात 646 रुग्णाची नोंद झाली आहे.
हेही वाचा- नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे