ETV Bharat / city

NMC Election Reservation: नागपूर महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर.. 'असे' आहे प्रभागनिहाय आरक्षण

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Nagpur Municipal Corporation Election Reservation ) आरक्षणाची शुक्रवारी सोडत काढण्यात आली. महानगर पालिकेच्या एकूण १५६ जागांपैकी ३५ जागा ओबीसींकरिता आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १८ जागा ओबीसीच्या ( OBC ) महिला प्रवर्गासाठी राखीव ( Reserved for women category ) ठेवण्यात आल्या आहेत.

NMC Election
नागपूर महानगरपालिका
author img

By

Published : Jul 29, 2022, 10:28 PM IST

नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ( Nagpur Municipal Corporation Election ) आरक्षणाची शुक्रवारी सोडत काढण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १२ मे रोजी प्रभाग रचना मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर ३१ मे रोजी एससी, एसटी एससी महिला, एसटी महिला जागांसाठी आरक्षण सोडत ( Abandoning reservation SC ST womens seats ) काढण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण ( OBC Reservation ) सुप्रीम कोर्टाने बहाल केल्याने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. टाऊन हॉलमध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी ( Municipal Commissioner Radhakrishnan B ) यांच्या उपस्थितीत ओबीसी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.
हेही वाचा - Ranveer Singh Nude Photoshoot : अभिनेता रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ? इतक्या वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा

नागपूर मनपा सार्वत्रिक निवडणूक २०२२ - नागपूर महानगरपालिकेत एकूण प्रभाग ५२ प्रभाग आहेत. त्यात एकूण १५६ जागा आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती (एससी) साठी ३१ जागा राखीव आहेत. तर १६ अनुसूचित जमाती (एसटी)साठी राखीव करण्यात आल्या आहेत. याशिवाय १२ जागा महिला एसटी राखीव आहेत. ओबीसीसाठी ३५ जागा राखीव करण्यात आलेल्या असून त्यापैकी महिला ओबीसीसाठी १८ जागा राखीव आहेत. याशिवाय सर्वसाधारण गटातील ७८ जागा असून त्यामध्ये महिला सर्वसाधारण ३८ जागा राखीव आहेत

हेही वाचा - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत, ठाण्यातील न्यायालयात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.