नागपूर - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएसी) परीक्षा कोरोनाच्या कारणाने पुढे ढकलण्यात आली. याबाबत सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली आहे. राजकीय पक्षाचे मेळावे, कार्यक्रम होत असताना परीक्षा सोशल डिस्टनसिंग ठेवून होत असतात. ऐनवेळी परीक्षा रद्द करणे चुकीचे आहे, असे म्हणत परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजे, अशी भूमिका असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपुरात निवास्थानी बोलत होते.
विद्यार्थी वर्षभर अभ्यास करून परीक्षेची वाट पाहत आहेत
विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत आहे. यात जर चार-चार वेळा परीक्षा रद्द होणार असतील तर त्यांनी काय करावे, बऱ्याच मुलांची वयोमर्यादा संपत आहे. विभागाचे मंत्री म्हणतात विभागातून पत्र केव्हा गेले माहीत नाही. सरकारमध्ये पूर्ण विसंवाद असल्याचे दिसून येत आहे.
परीक्षा या सोशलडिस्टन्स पाळूनच होत असते
आता कोरोनाचा कारण पुढे करणे चुकीचे आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. सरकारी पक्षाचे मेळावे सुरू आहे. ट्रॅक्टर मोर्चे निघत आहे. सत्कार सुरू आहेत. मग एमपीएसीच्या परीक्षेला कोरोना का ते सामाजिक अनंतर ठेवूनच घेतली जाते. सरकारची भूमिका चुकीची आहे, परीक्षा वेळेतच घेतली पाहिजे. परीक्षा पुढे ढकलणे योग्य नाही.
मुख्यमंत्री यांना मेल पाठवणार
भाजपची भूमिका स्पष्ट असून पूर्णपणे विद्यार्थ्यांसोबत आहे. परीक्षा घेतलीच पाहिजे मुख्यमंत्र्यांना परीक्षा घेण्याबाबत मेल पाठवला असल्याचे फडणवीस म्हणाले.
...तर त्यांनी राजीनामा दिला पाहीजे
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करून सांगितले की, मला न सांगता सचिव स्तरावरुन हा निर्णय घेतला आहे. मला अंधारात ठेवून निर्णय घेण्यात आला आहे. याची चौकशी केल्या जाईल, अशी माहिती ट्विट करून दिली. यावर बोलतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत की, असे कसे होऊ शकेल की त्यांच्या खात्यात काय चालले हे त्यांना माहीत नाही. त्यांनी असे बहाणे सोडून दिले पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे, असेही फडणवीस म्हणालेत.
हेही वाचा - नागपूर : वृद्धाच्या खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, पाचव्या पत्नीने केला खून!