नागपूर - मुंबईत इंधन दरवाढीला धरून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलबंडीवर भाई जगतापसह अनेक नेते होते. यावेळी आंदोलन बैलबंडी तुटल्याने यावर बोलतांना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटल्याचे बैलांना सुद्धा आवडले नसेल असा टोला लावला. ते नागपुरात विमानतळावर प्रासार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी आंदोलनादरम्यान बंडी तुटली असली तरी शुभेच्छा आहे असे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हणाले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी खुली झाल्याने एका दारू विक्रेत्याने चक्क वडेट्टीवार यांची पूजा केली. तेव्हा ते म्हणाले की या सरकारकडून दुसरी काही अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण यामुळे आश्चर्य वाटून घेऊ नका उद्या एखाद्या सट्टा व्यावसायिक सुद्धा अशा पद्धतीने एखाद्या मंत्र्याची पूजा करेल असा मिश्किल टोला हाणला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत नाही -
फडणवीस म्हणाले की, भास्कर जाधव यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा आहेत. मात्र पदावर गेल्यावर त्यांनी किमान निष्पक्षपणे काम करावे, अशी अपेक्षा आहे. जर आघाडीच्या तीन पक्षामध्ये अध्यक्षपदाबद्दल एकमत राहिले असते, तर आतापर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली असती, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारला लगावला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, मला वाटते त्यानंतर बोलायची गरज नाही. राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेते म्हणल्याचे कदाचित बैलांनाही आवडलेले नाही. त्यामुळे मुंबईत बैल पळून गेले, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.
ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केले, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. मात्र ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगले काम केलं आहे. त्यांनी नव्या सहकार खात्याचे स्वागतच केले आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारणाची सुरुवातच सहकारातून झाली आहे. आम्ही महानगरपालिका निवडणुकीच्या कामाला लागलो आहोत, आमच्या नगरसेवकांनी कोविड काळामध्ये चांगले काम केले आहे.
पीक कर्जाचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की फक्त 18 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन बँकांना कर्ज वाटपाबद्दल निर्देश द्यावे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बँकांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा. पूर्व विदर्भात ज्या तांदूळ घोटाळ्याचे आरोप होत आहे. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहे.
मध्यावधी निवडणुका होतील की नाही याचा निर्णय सरकारला करायचा आहे. मात्र ते तशी हिम्मत करणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे निवडणूक झाली तर ते धाराशाही होतील. कारण या सरकारविरोधात लोकांमध्ये खूप नाराजी आहे.
एमपीएससीच्या बाबतीत सरकार गंभीर नाही -
एमपीएसीच्या संदर्भात सरकार गंभीर नाही आहे. स्वप्नील लोणकर यांची आत्महत्या झाल्यानंतर सरकारने ज्या पद्धतीने जागा व्हायला पाहिजे होते तसे झालेले नाही. केवळ वक्तव्य केले जात आहे. वक्तव्य करून कोणाला दिलासा दिला जाऊ शकत नाही. सरकारकडून स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांना कुठली मदत केली नाही. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी कुठलेही पाऊल या सरकारने अजून उचललेले नाही, असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस म्हणाले.
केंद्रात नव्याने सहकार खाते निर्माण झाल्याने ज्यांनी सहकार क्षेत्रात चांगले काम केले ते आनंदी असतील. मात्र ज्यांनी सहकारचा स्वाहाकार केला त्यांना भीती वाटणे साहजिक आहे कारण सहकार खाते हे अमित शाह यांच्याकडे दिले आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांची राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी सहकार क्षेत्रातून सुरूवात झाली आहे. यामुळे त्यांना खात्याबद्दल संपूर्ण माहिती आहे.