नागपूर - अमरावतीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाडी परिसरात एका शोरुमसमोर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. आता या घटनेचे थरार सीसीटीव्ही फूटेजद्वारे समोर आला आहे. यामुळे अपघाताची तीव्रता स्पष्ट दिसत आहे.
संबंधित घटना 9 सप्टेंबरची आहे. रात्री 11च्या सुमारास हा अपघात घडला असून भरधाव चारचाकीने वळण घेणाऱ्या दुचाकीला धडक देत हवेत उडवले होते. धडक देणारी चारचाकीही यामुळे लांब फेकली गेली.
या अपघातात दुचाकी चालक संतोष भोंगाडे यांचा मृत्यू झाला. तर, कारचालक देखील गंभीर जखमी झाला. पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.