ETV Bharat / city

उपराजधानी पुन्हा हादरली; क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात आरोपीकडून मित्राचाच खून - नागपुरात दारू पिण्यावरुन मित्राचा खून

रामलखन पाल यांच्या घराशेजारीच आरोपी अनिल मेश्राम राहतो. दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने अनिल नेहमीच रामलखन यांच्या घरीच राहायचा. बुधवारी रात्री रामलखन आणि अनिल या दोघांनीही सोबत दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यावेळी अनिल आणि रामलखन यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वादावादी सुरू झाली.

nagpur
मारेकरी अनिल मेश्राम
author img

By

Published : Jun 18, 2020, 3:46 PM IST

Updated : Jun 18, 2020, 4:14 PM IST

नागपूर - तळीराम मित्रात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका मित्राचा दुसऱ्याने खून केला. ही घटना बेलतरोडी परिसरातील निरंजन नगरच्या ममता सोसायटीत बुधवारी रात्री घडली. रामलखन पाल असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. तर अनिल मेश्राम असे मारेकऱ्याचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळावरुन मारेकऱ्याला पकडले आहे.

विजय अकोत, पोलीस निरीक्षक

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार मृत रामलखन पाल यांच्या घराशेजारीच आरोपी अनिल मेश्राम राहतो. दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याने अनिल नेहमीच रामलखन यांच्या घरीच राहायचा. बुधवारी रात्री रामलखन आणि अनिल या दोघांनीही सोबत दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यावेळी अनिल आणि रामलखन यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वादावादी सुरू झाली. यावेळी अनिलने रामलखनला लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत रामलखनचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मारेकरी अनिल मेश्राम घरीच हजर असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी रामलखनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपासाला सुरवात केली आहे.

Last Updated : Jun 18, 2020, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.