ETV Bharat / city

Nurses Strike : नागपुरात विविध प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे दोन दिवस 'काम बंद आंदोलन'

author img

By

Published : Jun 23, 2021, 4:06 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदभरती सरकारने तत्काळ करावी. सोबतच केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा, शिल्लक सुट्ट्यांचा प्रश्न यासारख्या मागण्यांसाठी परिचारिकांनी सोमवारपासून (आज) आंदोलन सुरू केले आहे. सुरूवातीचे दोन दिवस दोन तास कामबंद आंदोलन केल्यावर परिचारिका संघटनेने आजपासून दिवसभराचा संप पुकारला आहे.

परिचारिका आंदोलन
परिचारिका आंदोलन

नागपूर - कोरोना काळात सरकारी रुग्णालयातील परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण आला, यासाठी पदभरती करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी परिचारिका संघटनेच्या (Nurses Strike) वतीने आज (बुधवार) व उद्या (गुरूवार) कामबंद आंदोलन पुकारण्यात करण्यात आले आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय व मेयो रुग्णालयातील परिचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिचारिकांची अनेक वर्षांपासून रिक्त पदे प्रलंबित आहेत. रिक्त पदे न भरल्याने कोरोना काळात रुग्णसेवा करताना परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पदभरती सरकारने तत्काळ करावी. सोबतच केंद्र सरकारप्रमाणे कोविड भत्ता द्यावा, शिल्लक सुट्ट्यांचा प्रश्न यासारख्या मागण्यांसाठी परिचारिकांनी सोमवारपासून (आज) आंदोलन सुरू केले आहे. सुरूवातीचे दोन दिवस दोन तास कामबंद आंदोलन केल्यावर परिचारिका संघटनेने आजपासून दिवसभराचा संप पुकारला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील परिचारिकांनी सोमवारी आणि मंगळवारी दोन तास कामबंद आंदोलन सुरू केल होते. सकाळी आठ ते दहा या दोन तासात परिचारिका आंदोलन केले होते.

परिचारिकांचे दोन दिवस 'काम बंद आंदोलन'
'या' आहेत मागण्या

गेल्या अनेक वर्षापासून परिचारिकांचे विविध प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित आहेत. वारंवार मागण्या करूनही शासन त्या मागण्याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे संघटनेला हे आंदोलनाचे शस्त्र उगारावा लागल्याचे आंदोलकांचे मत आहे. परिचारिकांची पद भरती करण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करा, कोरोना काळात परिचारिकांना जोखीम भत्ता द्यावा, कोरोना रुग्णांच्या सेवेनंतर सात दिवस विलगीकरणात राहण्याची परवानगी द्यावी, पदनामात बदल करावा, अशा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन केल्या जात आहे.

हेही वाचा -आता नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.