नागपूर - नागपूर जिल्ह्यात जिथे एप्रिल महिन्यात 80 हजारच्या घरात सक्रिय रुग्ण होते. आता त्यात घट झाली आहे. दुसऱ्या लाटेतील सक्रिय रुग्ण संख्या 2776 इतकी आहे. यातही केवळ 1071 रुग्ण हे दवाखण्यात उपचार घेत आहे. यामुळे सक्रिय रुग्णासोबत दररोज येणारे रुग्णसंख्या मागील तीन दिवसांपासून 80 च्या घरात आहे.
नागपुरात दुसऱ्या लाटेतील नवीन बाधितांचा निच्चांक नोंदवल्या गेला आहे.
नागपूर जिल्ह्यात सोमवारी आलेल्या अहवालात 10 हजार 635 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 81 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरी भागात 42 तर ग्रामीण भागात 36 बाधित रुग्ण मिळून आले आहेत. तसेच 8 जण दगावले आहेत. यामध्ये शहरी भागात 5, तर ग्रामीण भागात 0, तर जिल्हाबाहेरील 3 जण दगावले आहेत. तेच 322 जणांपैकी शहरात 233 तर ग्रामीण 99 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यात 1 हजार 071 जण हे रुग्णालयात उपचार घेत असून 1 हजार 605 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.
आतापर्यंतची परिस्थिती...
आतापर्यंत सक्रिय रुग्णसंख्येत घटून 2 हजार 776 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 4 लाख 76 हजार 088 जण रुग्ण कोरोना बाधित झाले आहे. यातून 4 लाख 64 हजार 434 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात मृत्यूचा आकडा हा 8978 वर जाऊन पोहचला आहे. नागपूरात सध्या रिकव्हरी रेंट हा 97.50 टक्क्यांवर वर असून रोज यात वाढ होत आहे.
सहा जिल्ह्यात 10 रुग्ण दगावले...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात 876 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 876 नवीन बधितांची नोंद झाली आहे. 10 जण हे कोरोना आजराचे बळी ठरले आहेत. यात बाधितांच्या तुलेनेत 561 अधिकचे रुग्ण हे कोरोमुक्त झाले आहे. यात नागपूरचा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या दर 0.8 टक्के, विदर्भातील रुग्णसंख्येच्या दरात घसरण होत 1.34 वर आला आहे.
हेही वाचा - विक्की आणि कॅटरिना 'प्रेमीयुगुल', हर्षवर्धन कपूरने दिला दुजोरा