ETV Bharat / city

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, एकाच दिवशी ४3 रुग्ण पॉझिटिव्ह

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे.

नागपूर कोरोना
नागपूर कोरोना
author img

By

Published : May 29, 2020, 9:00 PM IST

नागपूर - राज्याची उपराजधानी नागपुरात कोरोनाचा वेग मंदावला असताना आज पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज दिवसभरात तब्बल 43 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 16 रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, एकाच दिवशी ४3 रुग्ण पॉझिटिव्ह

आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 43 रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 501 इतकी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये नागपुरात 63 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा पाचशेच्या पुढे गेला आहे. कालपर्यंत नागपूर येथील मेयो आणि मेडिकल रुग्णालयातून ३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर नऊ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. सध्या नागपुरात १३८ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.