ETV Bharat / city

Aapali Bus Ticket Increase Nagpur : आपली बस सेवा महागली; प्रवाशांची तीव्र नाराजी - आपली बस सेवा नागपूर

नागपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात ( Nagpur Municipal Corporation Apali bus service ) येणाऱ्या आपल्या बस सेवेचा दर महिन्याचा खर्च हा सहा कोटी होता. मात्र इंधन दरवाढ आणि सुट्या भागाच्या किमती वाढल्याने हा खर्च सात ते आठ कोटीं रुपायांवर गेला आहे. त्यामुळे तिकिटांचे दर तब्बल 17 टक्क्यांनी वाढवण्यात आले असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन, आयुक्त राधाकृष्णन बी. ( Commissioner Radhakrishnan b ) यांनी दिली आहे.

Aapali Bus
Aapali Bus
author img

By

Published : Jun 17, 2022, 4:10 PM IST

Updated : Jun 17, 2022, 4:37 PM IST

नागपूर - शहराची जनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या शहर वाहतूक सेवेतील आपली बस सेवा तब्बल 17 टक्क्यांनी महागली आहे. इंधनाचे दर बऱ्यापैकी कमी झाले असताना शहर वाहतुक बस सेवेचे तिकीट दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढला आहे. इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे कारण देत आपल्या बसच्या प्रवासी भाड्यात 17 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. यापुढे 2019 मध्ये सुद्धा प्रवासी भाड्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. नागपूर महानगरपालिकेतर्फे चालविण्यात ( Nagpur Municipal Corporation Aapali bus service ) येणाऱ्या आपल्या बस सेवेचा दर महिन्याचा खर्च हा सहा कोटी होता. मात्र इंधन दरवाढ आणि सुट्या भागाच्या किमती वाढल्याने हा खर्च सात ते आठ कोटीं रुपायांवर गेला आहे. त्यामुळे तिकिटांचे दर तब्बल 17 टक्क्यांनी वाढवण्यात आले असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे प्रशासन, आयुक्त राधाकृष्णन बी. ( Commissioner Radhakrishnan b ) यांनी दिली आहे.

आपली बस तिकीट दर वाढीवर दिलेल्या प्रतिक्रिया

नागपूर महानगर पालिकेतर्फे तिकिटांचे दर वाढवण्यात यावे या करिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आर. विमला यांनी मंजुरी दिल्यानंतर आपली बस सेवेचे टिकीट 17 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. इंधन आणि सुटे भागांच्या वाढत्या किमतीमुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. तिकिटांचे दरवाढ झाल्यानंतर आपली बस प्रवासाचे किमान भाडे आता बारा रुपये झाले आहे. आतापर्यंत किमान दोन किलोमीटर प्रवासाचे भाडे दहा रुपये आकारले जात होते.

जाणून घ्या तिकीट दर : नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबर्डी येथील मोरभाव येथे आपली बसचे मुख्य बस स्थानक आहे. तिथूनच शहराच्या विविध भागांमध्ये बस सेवा दिली जाते. सीताबर्डी ते हिंगणाला जाण्यासाठी आता 39 रुपये प्रवाशांना खर्च करावे लागणार आहे. तर बर्डी ते खापरखेडा येथे जाण्याकरिता पन्नास रुपयांचे तिकीट दर आकारण्यात येणार आहे. याशिवाय बर्डी ते कोराडीला जाण्यासाठी 28 रुपये खर्च करावे लागतील, तर गोधणी करिता २४ रुपयांचे तिकीट काढावे लागणार आहे. या शिवाय बुट्टीबोरीला जाण्याकरिता ४४ रुपयांचे तिकीट घ्यावे लागेल.

आपली बसचे भाडे खालीलप्रमाणे :

०-२ किलोमीटरसाठी १२ रुपये
४-६ किलोमीटरसाठी १३ रुपये
४-६ किलोमीटरसाठी १६ रुपये
६-८ किलोमीटरसाठी २० रुपये
१०-१२ किलोमीटरसाठी ३४ रुपये
१४-१६ किलोमीटरसाठी ४४ रुपये
२०-२२ किलोमीटरसाठी १२ रुपये
२२-२४ किलोमीटरसाठी ५० रुपये
३०-३२ किलोमीटरसाठी ६३ रुपये

हेही वाचा - Satej Patil Vidhan Parishd : सर्व काही आलबेल आहे असे भाजपने समजू नये : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

Last Updated : Jun 17, 2022, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.