नागपूर - नागपुरात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांना आता गृहविलगीकरण ऐवजी आता संस्थात्मक विलगिकरणात राहावे लागणार आहे. तिसरी लाट आणि डेल्टा प्लसच्या धोका टाळण्यासाठी नागपूर मनपाचे आयुक्त राधाकृष्ण बी यांनी आदेश दिले आहे. यामुळे सद्याच्या स्थितीला नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नगण्य असले तर आतापासून खबरदारी घेतली जात आहे.
कोरोनाचे रुग्ण सध्या अल्प असले तरी 'डेल्टा प्लस'चा धोका अजून टळला नाही. यामुळे प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्ण संबंधित रुग्ण डेल्टा प्लसचा रुग्ण असू शकतो, असे समजून काळजी घेतली जाणार आहे. कारण कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंटची शक्यता लक्षात घेता त्याच्यापासून विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून यापुढे पॉझिटिव्ह आल्यास स्वतःच खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने संस्थात्मक विलगीकरणात आणि गरज भासल्यास रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दहा झोनमध्ये सूचना
या संदर्भात नागपूरच्या दहाही झोनमध्ये आयुक्तांच्या सूचना देण्यात आले आहे. संबंधित झोनमधील पॉझिटिव्ह आलेला रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात किंवा रुग्णालयात दाखल करून घेतले नाही, तर यावर विशेष नजर असणार आहे. मनपाचे संस्थात्मक विलगीकरण केन्द्र आमदार निवास येथे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल कॉलेज), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)मध्ये उपचारासाठी भरती होऊ शकतात. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्याचा इच्छेनुसार खासगी रुग्णालयामध्ये सुध्दा दाखल करण्याची मुभा असणार आहे.
हेही वाचा - चेंबूर चिल्ड्रन होममधील 18 मुले कोरोना पॉझिटिव्ह