नागपूर - केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या समितीमुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रभावामुळेच केंद्राला फेरविचार याचिका दाखल करावी लागली, अंस उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. ते विभागीय कार्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर बोलत होते.
'मागासवर्गीय पदोन्नतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ'
दरम्यान मागासवर्गीय पदोन्नतीच्या विषयाला धरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे, सोमवारी या संदर्भात कायदेविषयक टेक्निकल मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्यात काही त्रूटी आहेत त्या समजून घेऊन, पदोन्नती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचेही यावेळी राऊत यांनी सांगितले.
होही वाचा - लसींचा तुटवडा, मुंबईत आज व उद्या लसीकरण बंद