ETV Bharat / city

हे बरं नव्हं ! महामेट्रोच्या जाहिरातीत मंत्र्यांची नावे नसल्याने नितिन राऊतांची नाराजी

नागपूर शहरातील लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्ग या मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या जाहिरातीत राज्यातील मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे नाव नसल्याने, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

nitin raut
पालकमंत्री नितीन राऊत
author img

By

Published : Jan 28, 2020, 5:44 PM IST

नागपूर - शहरातील लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्ग या मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे 'माझी मेट्रो' या नागपूर मेट्रोच्या ११ किलोमीटर मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, यावेळी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत हे चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी भाषणा दरम्यान बोलून दाखवली.

नागपूरचे पालकमंत्री नितिन राऊत यांची प्रतिक्रिया....

नागपूर महामेट्रोच्या मार्गिकेच्या उदघाटन प्रसंगी वर्तमानपत्रांमध्ये पान भरून जाहिरात दिली. मात्र त्यात राज्यातील मंत्र्यांची नावे नव्हती. हा प्रकार लक्षात आल्याने नितीन राऊत यांनी स्पष्टपणे या संदर्भांत आपली नाराजी बोलून दाखवली. 'नागपुरचा असलेला सांस्कृतिक वारसा जपला गेला पाहिजे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नागपुरचा विकास व्हावा यासाठी संयुक्तिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भविष्यात महामेट्रोने अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी', असे राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा... माझी मेट्रो नागपूर : 'मला श्रेय नको तर, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहे'

नागपूर मेट्रोचा पहिला फेज हा आठ हजार 600 कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. मंगळवारी त्यातील एका मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे आता नागपुरात मेट्रोचे 25 किलोमीटरचे जाळे तयार झाले आहे. या मार्गिकेच्या उदघाटनाच्या निमित्ताने महामेट्रोकडून सर्व प्रमुख वर्तमानपत्रात पानभरून जाहिरात देण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिह पुरी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणात्याही मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. नागपूरचे पालकमंत्री असलेले नितीन राऊत यांचाही उल्लेख नव्हता.

हेही वाचा.... नियमांचे अन् वेळेचे पालन करा, पहिल्याच दिवशी मुंढेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

Intro:राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या मदतीने माझी मेट्रोच्या ऍक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाचं लोकार्पण करणार आले....यावेळी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत चांगलेच नाराज झाले होते...महामेट्रोने आज
ऍक्वा लाईनच्या उदघाटन प्रसंगी वर्तमान पत्रांमध्ये पान भरून जाहिरात दिली,मात्र त्यात राज्यातील मंत्र्यांची नाव नसल्याने नितीन राऊत यांनी स्पष्टपणे या संदर्भांत नाराजी बोलून दाखवली आहे Body:नागपूर मेट्रोचा पहिला फेज हा आठ हजार 600 कोटींचा प्रकल्प असून, या प्रकल्पाचं काम शेवटच्या टप्यात आले आहे..आज ऍक्वा लाईनच्या ११ किमी मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं,त्यामुळे आता नागपुरात मेट्रोचे 25 किलोमीटरचे जाळे तयार झाले असून त्यावर मेट्रो धावू लागली आहे...आज
ऍक्वा लाईनच्या उदघाटन निमित्ताने महामेट्रो कडून सर्व प्रमुख वर्तमान पत्रात पानभरून जाहिरात देण्यात आली,यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिह पुरी यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणात्याही मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याने यावर नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे....नागपुरचा सांस्कृतिक वारसा हा जपला गेला पाहिजे,विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नागपुरचा विकास व्हावा या साठी प्रयत्न केले आहेत,त्यामुळं भविष्यात महामेट्रोने अशी चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगून नितीन राऊत यांनी एका प्रकारे भाजपला चिमटे काढले आहेत,कारण त्या जाहिरातीत सर्वाधिक भाजपच्या नेत्यांचेच नाव आहेत

बाईट- नितीन राऊत-पालकमंत्रीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.