ETV Bharat / city

CM Uddhav Thackeray : नितीन राऊत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी - मुख्यमंत्री ठाकरे - आंबडेकर ऑन पाप्युलेशन पॉलिसी मुख्यमंत्री ठाकरे

सध्याच्या काळात अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. पण, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे भक्त ( Nitin Raut Devotee Of Ambedkar ) आहे, असे कौतुक मुख्यमंत्री ठाकरेंनी ( CM Uddhav Thackeray ) नितीन राऊतांचे केले आहे.

CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray
author img

By

Published : Apr 17, 2022, 10:58 PM IST

नागपूर - सध्याच्या काळात अंध भक्तांचा सुळसुळाट झाला आहे. पण, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे भक्त असून, त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून करत ( Nitin Raut Devotee Of Ambedkar ) आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी ऊर्जामंत्री नितिन राऊतांचे कौतुक केले. ते नागपुरात वसंतराव देशपांडे सभागृहात 'आंबडेकर ऑन पाप्युलेशन पॉलिसी' ( Ambedkar On Population Policy ) या ऊर्जामंत्री राऊत लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने ते बोलत होते. यावेळी राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे हे सुद्धा उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे आणि नितीन राऊत संवाद साधताना

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे समाजाला दिशा देणारे महामानव कधी कधीच जन्माला येतात. त्यांच्या विचारातून आपल्याला दिशा मिळते. अंध भक्त हा त्याचे दैवत बदलू शकते. कारण त्याचा फायदा पाहून झुकतो. पण, खरा भक्त हा तोच असतो जो आपल्या गुरूने दाखवलेल्या वाटेने चालणार आणि ती समजून घेत इतरांना चालण्याचा संदेश देण्याचे काम करतो. बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीला समजून सांगण्याचे काम घेतले ते कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी नितीन राऊतांना उद्देशून म्हटले आहे.

नितीन राऊत यांनी बोलताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी ठेवणारे होते. आजपासून 84 वर्षांपुर्वीचा त्यांनी लोकसंख्या वाढीचे परिणाम मांडले आहे. देशातील बरोजगारी, बेकारी यामुळे लोकसंख्या वाढीत आहे. त्यामुळे या कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करण्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ समस्याच मांडली नाही तर त्याचे उपायही त्यांनी सुचवले आहेत. त्या संदर्भात 10 नोव्हेंबर 1938 ला तसा ठरावही विधानसभेत मांडला. पण, त्यावेळी तो मान्य झाला नाही. केंद्रात इंदिरा गांधी यांचे सरकार आले असताना, आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजनाचे काम केले.

देशाची वाढती लोकसंख्या पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेत राज्याच्या आरोग्य विभागाला आणि प्रशासनाला निर्देश द्यावेत. आपले कुटुंब एका अपत्य पर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या अल्प उत्पन्न असलेल्या किंवा दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना वाढीव मदत करावी. त्या कुटुंबाना विविध शासकीय योजनांच्या वाढीव लाभासह एकरकमी प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Ajit pawar : मोबाईल रिचार्ज प्रमाणे विजेसाठी प्रिपेड कार्ड आणण्याचा राज्य सरकारचा विचार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.