नागपूर - भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवकांच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी अंतर्गत सर्वेक्षण केलं जातं आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari on nagpur municipal corporation election ) यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे विद्यमान नगरसेवकांच्या चिंतेत भर पडली आहे. ज्या इच्छुक उमेदवारांच्या मागे जनता असेल त्यालाच निवडणुकीत तिकीट मिळेल. ज्याच्या मागे जनता नाही, त्याला तिकीट मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नागपुरातील डबल डेकर जलकुंभ भूमीपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ( nagpur municipal corporation election ) येत्या काळात होऊ घातलेली आहे. महापालिकेत 15 वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचे कडवे आवाहन भाजपापुढे आहे. नागपूर मनपाची निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. निकालाचे परिणाम राज्याच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारे असल्याने भाजपाने निवडणुकीची तयारी फारच जोमाने सुरू केली आहे.
भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची -
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नागपूर प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात नागपूरचे महत्व वाढलेले आहे. मध्यंतरीच्या काळात नागपूर हे राज्याचं सत्ताकेंद्र होतं, असं देखील म्हटलं जायचं. त्यामुळे नागपुरची सत्ता कायम राहणे, हे भारतीय जनता पक्षा सोबतच गडकरी आणि फडणवीस या दोन दिग्गज नेत्यांनी करिता अत्यंत महत्वाचं मानलं जातं आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार निवडताना अनेक निकषांचा विचार केला जाणार आहे. त्याचेच संकेत गडकरी यांनी सभेत बोलताना दिले आहे.
हेही वाचा - Punjab Assembly Elecions 2022 : कुमार विश्वास यांच्या आरोपांवर केजरीवाल गप्प का? राहुल गांधींचा सवाल