नागपूर - तेलाच्या अर्थकारणाने संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही उदारमतवादी लोक देश चांगल्या विचाराचे असून ते यात पडत नाही. पण काही धर्मांध मानणारे लोक दहशतवादी कारवायांसाठी डॉलरमधून पैसा पुरवतात असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ते नागपुरात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.
तेलाच्या अर्थकारणातून दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या उदारमतवादी लोकांमध्ये आणि धार्मिक कट्टरतावादी लोकांध्ये संघर्ष पाहायला मिळतो. याचे मूळ अर्थकारणात नसून जागतिक पातळीवर शांतता आणि स्थिरता हे तेलाचे अर्थकारण सुटल्या शिवाय येऊ शकत नाही. पण येत्या दहा वर्षात भारतात झालेले ऊर्जा क्षेत्रातील बदल पाहता भारतावर याचे परिणाम होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा विश्वासही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवला.
तेलाच्या अर्थकारणामुळे जागतिक स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. याचे गंभीर परिणाम भारतावर होणार असे पुस्तकात म्हटले असले तरी मला विश्वास आहे. पुढील दहा वर्षांत ते प्रश्न संपुष्टात येईल आणि नवीन बाबी उदयास येणार आहे. कारण ज्या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल या इंधनाला पर्याय उपलब्ध होत आज, यात मग बायोगॅस असो, इथेनॉल, असो ग्रीन हायड्रोजन हे जे पर्याय आहे, ते या तेलाचा वादळाला शांत करतील असा विश्वास असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. भारतात आजच्या घडीला पेट्रोलियम गॅस आणि इंधनावर 8 लाख कोटीचा खर्च केला जात आहे. येत्या पाच वर्षांत हा खर्च वाढत्या इंधनाची मागणी पाहता 25 लाख कोटीच्या घरात वाढल्यास याचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागणार आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.