नागपूर - एक लाख कोटींची दिल्ली ते मुंबई रोड जागा हस्तांतरण करून पूर्ण केली. पण महालातील स्वतःच्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता न बंधू शकल्याने थकलो आहे, ( Nitin Gadkari on road development ) असे खुद्द देशाचे रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. रस्ता बांधकामाला होत असलेल्या विरोधामुळे त्यात येणारा अर्थ डे पाहता एक पुस्तक लिहणार असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले. नागपूरातील खासगी वृत्तवाहिनीच्या विदर्भ संपादिका सरिता कौशिक यांच्या हस्ते लिखित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री ( Nitin Gadkari book publication in Nagpur ) बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari on court cases ) म्हणाले, की एखाद्या कामात लोक खूप वेळा न्यायालयात जातात. त्यामुळे कामाचा खोळंबा होऊन अडचणी आल्या आहेत. मात्र तो रस्ता अजून पूर्ण झाला नाही अशी खंत बोलताना व्यक्त केली. मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या अजनीच्च इंटर मॉडेल स्टेशनबद्दल ( Model station development ) ते बोलताना म्हणाले, की तो प्रोजेक्ट् रद्द करत त्यात बदल केले आहेत. कारण, त्यासाठी 1200 कोटी रुपये मंजूर आहेत.
हेही वाचा-Charged Against Police Officers : तीन पोलीस अधिकाऱ्यांवरच खंडणीचा गुन्हा दाखल
केवळ 40 ते 48 एकर जागेवरील फेक वनसाठी जागा घेणार-
केवळ 40 ते 48 एकर जागेवरील फेक वनचे कामासाठी लागणार एवढीच जागा घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य करत भूमिका स्पष्ट केली. सध्या स्थित असलेले कारागृहाची जागा घेऊन ते दुसरीकडे स्थलांतरित करायचे. त्यासोबत फूड कार्पोरेशनची जागा घ्यायची आहे. फूड कार्पोरेशन हे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथील ड्रायपोर्टवरील मल्टी मॉडेल हबमध्ये स्थलांतरीत करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. अजनीच्या त्याठिकाणी मेडिकल चौकापर्यंत एक पूल बांधणार ठिकाणी डेव्हलपमेंट होईल, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना नियंत्रणात; शनिवारी दीड हजार नवे बाधित
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही झाडे कापली नाहीत--
नितीन गडकरी म्हणाले, की मी वृक्षप्रेमी असताना माझ्यावर झाडे कापण्याचा आरोप होत आहे. बद्रीनाथ केदारनाथ हा रस्ता बांधायला घेतला. यामध्ये जवळपास अडीच लाख झाडे कापली जाणार होती. सर्वोच्च न्यायालयाने झाडे कापण्याची परवानगी दिली होती. मात्र झाडे न कापण्याचा निर्णय घेत अधिकाऱ्यांना सुनावले. एकही झाड न तोडता पूर्ण झाड हे रिट्रान्सप्लांट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एखाद्या कामाच्या परवानगीसाठी न्यायालयात लागणाऱ्या विलंबाचाही उल्लेख गडकरी यांनी बोलताना केला. अजनीमध्ये अनेक झाडे सुबाभूळसारखी आहेत. मात्र, एकही झाड तोडायचे नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- Hindustani Bhau Released Jail : हिंदुस्तानी भाऊची जेलमधून सुटका; म्हणाला "मी बाळासाहेबांचा..."