नागपूर - बहुप्रतिक्षित नागपूर मेट्रोच्या 'अॅक्वा लाईन' मार्गाचा उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित कार्यक्रमाला व्हिडियो कॉन्फरन्समार्फत उपस्थिती दर्शवली.
यावेळी गडकरी यांनी विस्तारलेल्या मेट्रो प्रकल्पाबद्दल माहिती दिली. तसेच नागपूरच्या अजनी मेट्रो स्टेशनसाठी केंद्राने अतिरिक्त एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. या निधीतून 'अजनी'चे मेट्रो स्थानकाला जगातील सर्वात सुंदर स्थानकांपैकी एक बनणार आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेतर्फे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या अनावरण या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मेट्रोचा दुसरा टप्पा हिंगण्यापर्यंत विस्तारणार ; सॅटेलाईट सिटीसाठी प्रयत्नशील
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नऊ हजार कोटींची प्राथमिक निधी उपलब्ध करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच अतिरिक्त कुमक मनपा व अन्य स्रोतांमार्फत गोळा करणार असल्याचे ते म्हणाले. याद्वारे गडचिरोलीत वर्षापर्यंत मेट्रोचे जाळे विस्तारणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच वर्धा ते नागपूर अंतर केवळ 35 मिनिटांमध्ये पार होणार असून याद्वारे सॅटेलाईट सिटीज् तयार करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितले.