ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद, गुरुवारी २५९ नवे रुग्ण

आज गुरूवारी २५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार या दोन दिवसात शून्य मृत्यूची नोंद झाली होती, आज गुरूवारी पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तर आतापर्यंत एकूण १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २४०७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 17, 2022, 7:16 PM IST

Updated : Feb 17, 2022, 7:24 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. आज गुरूवारी २५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार या दोन दिवसात शून्य मृत्यूची नोंद झाली होती, आज गुरूवारी पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तर आतापर्यंत एकूण १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून २४०७ सक्रिय रुग्ण आहेत.

  • २५९ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१७ फेब्रुवारीला) २५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५४ हजार ९९१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३३ हजार ४९७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९४५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २४०७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०३ टक्के इतका आहे.

  • ९७.६ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या २५९ रुग्णांपैकी २३५ म्हणजेच ९१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज २० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ७ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३६,४१९ बेडस असून त्यापैकी ८५८ बेडवर म्हणजेच २.४ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९७.६ टक्के बेड रिक्त आहेत.

  • रुग्णसंख्या घटतेय

मुंबईत गेल्या वर्षी फेब्रुवारीत दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर तिसरी लाट सुरू झाली त्यात वाढ होऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटत आहे. १ फेब्रुवारीला ८०३, २ फेब्रुवारीला ११२८, ३ फेब्रुवारीला ८२७, ४ फेब्रुवारीला ८४६, ५ फेब्रुवारीला ६४३, ६ फेब्रुवारीला ५३६, ७ फेब्रुबारीला ३५६, ८ फेब्रुवारीला ४४७, ९ फेब्रुवारीला ४४१, १० फेब्रुवारीला ४२९, ११ फेब्रुवारीला ३६७, १२ फेब्रुवारीला ३४९, १३ फेब्रुवारीला २८८, १४ फेब्रुवारीला १९२, १५ फेब्रुवारीला २३५, १६ फेब्रुवारीला २५५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत

  • १२ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारीला तसेच आज गुरुवारी १७ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

  • धारावीत १ नवा रुग्ण

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली.
७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १७ फेब्रुवारीला १ रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६३९ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८२१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ८ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - Thane Bay Area : ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा; राज्याचा केंद्र सरकारला प्रस्ताव

Last Updated : Feb 17, 2022, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.