नागपूर - पूर्व विदर्भात शनिवारी 1,609 कोरोना बधितांची नोंद झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यात 1183 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत. तर 9 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात नागपुरात शनिवार बाजारपेठा बंद ठेवत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण बाजारपेठेत गर्दी नसली तरी रस्त्यांवर गर्दी दिसून आली आहे. यामुळे या उपाययोजनाचा खरच फायदा होईल का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
नागपूर जिल्ह्यात 1183 कोरोना बधितांमध्ये 904 रुग्ण हे शहरातील विविध भागातून पॉझिटिव्ह असल्याचे तपासणी अहवालात पुढे आले आहे. कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे शहरातून येत आहे. तेच ग्रामीण भागातून 276 रुग्ण मिळून आले आहे. बाहेरून उपचारासाठी आलेल्यांमध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे. यात शहरात 9 जणांचा मृत्यूची नोंद आहे. यात शहरात 5, तर 1 ग्रामीण भागातून आणि तीन रुग्ण बाहेरून आलेल्याचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यात 10, 788 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात 10746 सक्रिय रुग्ण आहे. तेच 4283 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-अमरावतीत लॉकडाऊन शिथिल; सर्व दुकाने उघडली, भीती मात्र कायम
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 12 लाख 99 हजार 756 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात 1 लाख 56 हजार 458 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात 1 लाख 41 हजार 329 जण कोरोनातुन मुक्त झाले आहे.
हेही वाचा-अभिनेत्री सुलोचना लाटकर दादासाहेब फाळके पुरस्कारापासून वंचित का? सरकारला सवाल
मार्च महिन्यात 6 दिवसात 6630 कोरोना पॉझिटिव्ह-
नागपूर जिल्ह्यात 1 मार्चला 877, दोन मार्चला 955, तीन मार्चला 1152, चार मार्चला 1070, ५ मार्च मागील महिन्याचे रेकॉर्ड मोडत 1393 कोरोनाबधितांची नोंद झाली आहे. शनिवारी 6 मार्च असे एकूण 6630 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
पूर्व विदर्भात 1609 बधितांची भर, 1,193 जण कोरोनातून मुक्त
नागपूर जिल्ह्यात 1183 बाधित असून 860 कोरोनातून बरे झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात 47 बाधित मिळाले आहेत. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. तर 120 बधितांची नोंद झाली आहे. तर 34 जण कोरोनातून बरे झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात 16 बाधित असून 10 बरे झाले आहेत. वर्ध्यात 223 रुग्णाची भर असून 264 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. गडचिरोलीत 20 कोरोना बधितांची भर पडली आहे. 10 जण हे कोरोनातून बरे झाले आहेत. यात 1193 जणांची सुट्टी झाली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.