नागपूर - विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी शुक्रवारी ईडी प्रकरणाचा पुरेपुर सदुपयोग केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊन प्रसार माध्यमात आणि जनतेत पक्षाबद्दल चर्चा घडवून आणली. याचा फायदा राष्ट्रवादीला थोड्या प्रमाणात का होईना पण होणार आहे, असे वक्तव्य राजकीय विश्लेषक विनोद देशमुख यांनी केले आहे.
हेही वाचा - 'पवार यांच्यावरील ईडी कारवाई म्हणजे बदनामीचा भाजपचा कुटील डाव'
देशमुख म्हणाले, ईडी प्रकरणात पवारांना अनेक लोकांनी पाठिंबा दिला. त्यांच्या वयाचा विचार करता लोक भावनिक झाले असून जनतेची सहानुभूती त्यांना मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला याचा फायदा होईल.