ETV Bharat / city

Jayant Patil on BJP Hindutva : हिंदुत्वाच्या मतांमध्ये दुफळी पडते म्हणून शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केलं; जयंत पाटील यांचा आरोप

author img

By

Published : Aug 30, 2022, 8:26 PM IST

भारतीय जनता पक्षाने मनसेला सोबत घेतल्यावर हिंदी आणि मराठी भाषिकांचा प्रश्न तयार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil on BJP MNS Alliance यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

Jayant Patil
जयंत पाटील

नागपूर - भारतीय जनता पक्षाने मनसेला सोबत घेतल्यावर हिंदी आणि मराठी भाषिकांचा प्रश्न तयार होऊ शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil on BJP MNS Alliance यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. जयंत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी नागपुरात या दौऱ्याचा समारोप झाला. या दौऱ्या अंतर्गत जयंत पाटील विदर्भातील विविध जिल्ह्यात गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम सुरु असून या मोहिमेला गती देण्यासाठी हा दौरा असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

हिंदी आणि मराठी भाषिकांचा प्रश्न तयार होईल:- सध्या भाजप नेते माणसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. मात्र भाजप व माणसे निवडणुकीत सोबत आल्यास हिंदी व मराठी भाषिक मतदारांचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

म्हणून शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केलं:-सर्वधर्म समभाव हा हिंदुत्वाचा मूळ भाग आहे. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मतांमध्ये दुफळी पडते म्हणून शिवसेना फोडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. अनिल देशमुख हे विदर्भातील प्रमुख नेते आहेत त्यांना कोणतेही कारण असताना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. असे असले तरी सामान्य कार्यकर्ता हा न खचत पक्ष संघटनेसाठी काम करीत असल्याचेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.